
एका महिला नगरसेविकेवर पुण्यातील खंडाळा येथे पिस्तुलचा धाक दाखवत एका वॉटर पार्क मध्ये विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच औरंगाबाद येथे एका लॉजवर संबंधित महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र गुंगीचे औषध दिल्यानंतर वेळोवेळी तिच्यावर बलात्कार करण्यात असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
मतीन सय्यद असे नाव आहे. या प्रकरणी मतीन सय्यद सामील असून त्याच्या भाऊ आणि मेहुण्याने पीडित महिलेचा विनयभंग केला आहे. यापूर्वी मतीन याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीच्या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे एका वर्षाची शिक्षा सुनावली होती. तसेच ड्रग्ज, बुटलेगर्स यांच्यासह अन्य कायद्याअंतर्गत यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते.(कोल्हापूर: आईवडीलांकडून पोटच्या तरुण मुलाची हत्या, विहरीत टाकला मृतदेह, हातकणंगले येथील घटना)
या प्रकरणी निलंबित मतीन सय्यत सह अन्य तीन जणांवर चाकण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एमएमआयच्या नगरसेवकसुद्धा या प्रकरणी सामील आहे.