कोल्हापूर: आईवडीलांकडून पोटच्या तरुण मुलाची हत्या, विहरीत टाकला मृतदेह, हातकणंगले येथील घटना
प्त माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता हा मृतदेह अनिकेत वाळवेकर या तरुणाचा असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह अनिकेत वाळवेकर या तरुणाचा असल्याचे समजले. तसेच, ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर अनिकेत याच्या जन्मदात्या आईवडीलांनीच केली असल्याचे पुढे आले. प्राप्त माहितीनुसार, अनिकेत वाळवेकर हा काहीसा विक्षिप्त तरुण होता. त्याचे कुटुंबीय त्याच्या
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हातकणंगले (Hatkanangle) येथे जन्मदात्या आईवडीलांकडूनच पोलच्या मुलाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अनिकेत वाळवेकर (Aniket Vlwekar) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या हत्येत या तरुणाचा मानलेला मामाही सहभागी होता, अशी माहिती आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पेटवडगाव येथील विहिरीत एक बेवारस मृतदेह सापडला होता. या मृतदेहाविषयी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता हा मृतदेह अनिकेत वाळवेकर या तरुणाचा असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मृतदेह अनिकेत वाळवेकर या तरुणाचा असल्याचे समजले. तसेच, ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर अनिकेत याच्या जन्मदात्या आईवडीलांनीच केली असल्याचे पुढे आले. (हेही वाचा, सातारा: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने आईनेच केली हत्या)
प्राप्त माहितीनुसार, अनिकेत वाळवेकर हा काहीसा विक्षिप्त तरुण होता. त्याचे कुटुंबीय त्याच्या विक्षिप्त पणाला कंटाळले होते. तो सतत दारु प्यायचा. त्याला दारुचे प्रचंड व्यसन होते. त्यातच त्याला कर्ज घ्यायचीही सवय होती. तो नेहमी कर्जबाजारी असे. डोक्यावर आगोदरच कर्ज असताना तो आईवडीलांकडे सातत्याने पैशासाठी तगादा लावत असे. त्याच्या विक्षिप्तपणाला कंटाळून आईवडीलांनी त्याची हत्या केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2019 11:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

