Pune Crime: पुण्यातील बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Pune Crime News PC TWITTER

Pune Crime: पुणे येथील जंगली महाराज रोड परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार केला आहे. धीरच अग्राडे असे बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. गोळीबाराची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अग्राडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुणे पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे पाठी मागील 24 तासांमध्ये पुणे शहरामध्ये घडलेली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शहरात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- व्यापाऱ्याचा घरातून 9.5 लाख रुपयांसह 12 तोळे सोने चोरीला, सोबत CCTV नेला;)

अधिक माहितीनुसार, दुपारी तीन वाजता दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. हल्लेखोर स्विगी कंपनीचे कपडे परिधान करून दुचाकीवरून आले होते. दोघांन्ही हेलमेट घातलं होते. दोघांन्ही खिश्यातून पिस्तूल काढून दोन वेळा फायर केला. परंतु फायर न झाल्यामुळे धीरज वाचले.  हल्लेखोर गोळीबारच्या घटनेनंतर फरार झाले. या घटनेनंतर परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

#WATCH | #Pune: Two Men In 'Swiggy' Uniform Attempt To Shoot Builder In Broad Daylight On JM Road #PuneNews #Crime pic.twitter.com/xhfnIqJOn3

धीरज यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. पोलिस उपायुक्त संदीप गिल, एसीपी साईनाथ ठोमरे, पोलिस निरिक्षक चंद्रशेखर सांवत यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी सुरु केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे.  धीरज हे एक नांमाकित बांधकाम व्यवसायिकांपैकी एक आहे.  धीरज हे डीएस अरगडे प्रमोटर्स अँड बिल्डर्स आणि रिअल इस्टेट फर्मचे मालक आहेत, ज्याचे कार्यालय जंगली महाराज रोडवरील मॉडर्न स्कूलच्या समोर अरगडे हाईट्स येथे आहे.