Chhatrapati Sambhaji Nagar Crime: व्यापाऱ्याचा घरातून 9.5 लाख रुपयांसह 12 तोळे सोने चोरीला, सोबत CCTV नेला; छत्रपती संभाजीनगर येथील घटना
Thief PC PIxabay

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: चोराने एका व्यापाराच्या घरातून तब्बल 9 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि 12 तोळे सोने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोराने शक्कल लढवत घरात प्रवेश केला आणि घरातून चोरी केली. ही घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. विशेष म्हणजे चोराने जाताना CCTV कॅमेरे देखील काढून नेले आहे. परिसरात या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- भररस्त्यात धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या, थरारक घटनेचा Video समोर

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एन वन परिसरात ही घटना घडली आहे. शहरातील एका व्यापाराच्या घरात ही घटना घडली आहे. चोरांने  रात्री बाथरूमच्या खिडकीच्या काचा बाजूला काढून घरात प्रवेश केला. घरातील सोनं आणि पैसे चोरून फरार झाला. चोराने तब्बल 9 लख 50 हजार रुपये रोख रक्कम आणि 12 तोळे सोने लंपास केले. एवढचं नाही तर चोरी नंतर घराच्या परिसरातील CCTV कॅमेरे देखील चोरून नेले आहेत.

एन वन परिसरातील रामभाऊ किसन तांबे हे एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मूळ गावी गेले होते. त्यानंतर ते १५ एप्रिल रोजी रात्री उशिरा घरी आले त्यावेळी त्यांच्यात लक्षात आले की सीसीटीव्ही कॅमेरा आणि डीव्हीआर जागेवर नाही. त्यामुळे त्यांनी घरी संपुर्ण तपासणी केली. घरातील पैसे आणि सर्व सोनं चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.