Mumbai News: व्हिडिओ पाहून एटीएममधून पैसे चोरण्याचा प्रयत्न, आरोपीला वाकोला पोलिसांकडून अटक
ATM PC PIXABAY

Mumbai News: मुंबईतील सांताक्रुझ पूर्व येथील बॅंक ऑफ बडोदाच्या एटीएममधून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केले आहे. वाकोला पोलिस ठाण्यात हे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. आरोपीने हिंदी चित्रपट आणि युट्यूब व्हिडिओजच्या माध्यमातून चोरीचे तंत्राचे ज्ञान मिळवून याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला. आरोपी सद्या पोलिसांच्या कस्टडीत आहे. या घटनेनंतर वाकोला परिसरात एकच खळबळ उडाली होती. (हेही वाचा- कुत्रा भूंकल्यावरुन वाद;)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जावेद शेख असं आरोपीचे नाव आहे. तो 21 वर्षाचा आहे. जावेद पालघर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, वाकोला पाईपलाईन येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.ही घटना 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.22 वाजता घडली. त्याने एटीएममध्ये प्रवेश केला आणि कटरचा वापर करून मशीन उघडण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न करून ही मशीन उघडत नव्हती. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

चोरीची घटना लक्षात येताच, बॅंक अधिकारीने या घटनेची माहिती वाकोला पोलिस ठाण्यात दिली. त्यांने अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 70 - 80 सीसीटीव्ही फुटेजची रेकॉर्डिंगची तपासणी केली. आरोपी धोबीघाट परिसरात जाताना दिसला. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ग्राइंडर ब्लेड, दोन ब्लेड, एक कटर, चष्मा, यांत्रिक हातमोजे, एक पैशाची बॅग, एक पाईप आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी जप्त केली आणि दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले.