कुत्रा (Dog) भूंकल्यावरुन झालेल्या वादातूनत एकाने दोघांवर चाकूहल्ला केला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना मुंबई येथील मुलुंड (Mulund) परिसरात बुधवारी (3 मार्च) सकाळी घडली. पोलिसांनी दिनेश बोरीचा नामक आरोपीला ताब्यात घेतले आहेत. प्राप्त माहितीनुसार एक महिला आपल्या नातेवाईकांसोबत कुत्र्याला घेऊन फिरत असताना रस्त्याने जाणाऱ्या बोरीचा याच्यावर कुत्रा भुंकला. त्यावरुन चिडलेल्या बोरीचा याने कुत्र्याला लाथ मारली आणि वाद सुरु झाला. दरम्यान, वाद (Fight Over Barking Dog) वाढत गेला आणि बोरिचा याने स्वत:जवळ असलेल्या चाकूने दोघांवर हल्ला केला. भांडणात मध्यस्थी करत असलेल्या व्यक्तीलाही आरोपीने जखमी केले.
प्राप्त माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा एक महिला आणि तिचे तीन नातेवाईक त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत फिरायला गेले होते. दरम्यान, दिनेश बोरीचा समोर आला. कुत्रा त्याच्यावर भूंकला. त्यामुळे बिथरलेल्या बोरीचा याने कुत्र्याला लाथ मारली. त्यामुळे महिला आणि नातेवाईक संतापले. त्यांनी बोरिचा याला जाब विचारला. या वेळी वाद निर्माण झाला. वाद टोकाला गेला. या वेळी महिलेचे नातेवाईक आणि बोरिचा यांच्यात धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, बोरिचा याने तिथून पळ काढला. मात्र, पळून जाण्यापूर्वी त्याने आपल्याकडील चाकूने दोघांवर हल्ला केला. पोलिसांनी त्याला मोठ्या शथाफीने पकडले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता अधिक तपासासाठी त्यास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले. (हेही वाचा, Research On Dogs: कुत्र्यांना समजतो संज्ञांचा अर्थ, प्रतिमाही असतात ज्ञात; नव्या संशोधनात खुलासा)
पाळीव आणि मोकाट अशा दोन्ही प्रकारच्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या वादावादीच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. अनेकदा मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. दुसऱ्या बाजूला उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये अनेकदा विशिष्ट प्रजातीचे कुत्रे पाळले जातात. हे कुत्रे शरीराने मजबूत असतात. अनेकदा इमारतीच्या मोकळ्या जागा, उद्वाहन किंवा रस्त्यांवरुन जाताना ते रहिवाशांवर हल्ला करताना दिसतात. अशा अनेक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाल्याचे पाहायला मिळालेआहे. (हेही वाचा, French Man Discovered Dinosaur: फ्रान्सच्या व्यक्तीने कुत्र्याच्या सहाय्याने शोधला 70 दशलक्ष वर्षे जुना डायनासोर- मीडिया रिपोर्ट)
दरम्यान, कुत्र्यांचा नागरिकांवर होत असलेला हल्ला आणि त्रास याला कंटाळून कुत्र्यांवर केले जाणारे हल्ले, विषप्रयोग यांसारख्या घटनाही वाढू लागल्या आहेत. अलिकडेच वसईतील एका गृहनिर्माण संकुलाजवळ आठ कुत्र्यांना विषबाधेने मारण्यात आले. याव्यतिरिक्त, अंधेरी (प.) मधील लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळ एका स्थानिक रहिवाशाने कथितरित्या चावा घेतल्याने चार वर्षांच्या भटक्या कुत्र्यासोबतही असाच प्रकार घडला.