Hingoli News: मराठा आरक्षणाचे पडसाद, हिंगोली जिल्ह्यात भाजप कार्यलय पेटवून देण्याच्या प्रयत्नात, शहरात मोठा बंदोबस्त
Fire (PC - File Image)

Hingoli News: मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणीत आंदोलने होत आहे. हिंगोली, बीड मध्ये तीव्र आंदोलने होत आहे. बीडमध्ये आमदारांचे घर आणि कार्यालय जाळले त्यानंतर हिंगलोलीत सुध्दा आंदोलनकर्त्यांनी आंदोलने सुरु केली आहे. हिंगोलीत रात्रीच्या वेळीस भाजप कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील कृषी अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या भाजप कार्यालयाला अज्ञात व्यक्तीकडून पेटवून देत असताना वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हिंगोली पोलिस कार्यलयाला कोणी आग लावली याच्या शोधात आहे. त्यामुळे शहरात मोठं बंदोबस्त लावण्यात आले आहे. ठिकठिकाणी राजकिय नेत्यांचे बंगले, कार्यालये आंदोलन कर्त्यांकडून पेटवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात मोठी अशांतता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलकांकडून राजकिय पक्षांना टार्गेट केले जात आहे. हिंगोली शहारतील भाजप कार्यालय पेटवून देण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे.

शहरातील औंढा नागनाथ महामार्गावर शिरडशहापूर येथे रास्तारोको आंदोलन होणार आहे. वसमत तालुक्यात कवठा फाटा त्याचबरोबर गवळी मारुती मंदिराजवळ आंदोलनकर्ते रास्तारोको केले जाणार आहे. हिंगोली नांदेड महामार्ग डोंगरकडा येथे देखील रस्ता रोखला जाणार आहे. जिल्ह्यातील बाजारपेठे देखील बंद राहणार आहे. शहरात राज्य सरकारचे  बॅनर फाडण्यात आले.