Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पुणे शहरातील (Pune City) वाढती गुन्हेगारी सध्या अनेकांच्या चिंतेत वाढ करत आहे.  पुण्यात मारामारीच्या मोठ्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. या घटना वाढल्याने सध्या पोलीस दल देखील सक्रिय झाले आहे. पुणे शहारातील मुंढवा (Mundhva) भागात सध्या अशीच एक घटना घडली आहे. मुंढवा भागातील पबमध्ये प्रवेश नाकारला म्हणून तीन तरुणांनी त्या पबच्या वेटरला बेदम मारहाण केली आहे. दरम्यान, याप्रकरणी वेटर धीरेंद्र चौहान यांनी मुंढवा पोलिस (Pune Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सगळा प्रकार शनिवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडला. "ओरीला" हा मुंढव्यातील प्रसिद्ध असणाऱ्या पबमध्ये फिर्यादी धीरेंद्र हा या ठिकाणी वेटरचे काम करतो. शनिवारी ३ अज्ञात तरुण याठिकाणी पोहचले आणि पबमध्ये प्रवेश करण्यासाठी गेटवर थांबला होता. मात्र तिघेही जण मद्यपान करून आले आहेत. धीरेंद्र यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी या तिघांना प्रवेश नाकारला.

या गोष्टीचा राग मनात धरुन रात्री सव्वा दोन वाजता धीरेंद्र काम करुन सहकाऱ्यासोबत घरी जात असताना तिघांनी मोटार बाईक वरुन येत त्यांची वाट अडवली आणी पब मध्ये प्रवेश न देण्याचा जाब विचारत धीरेंद्रला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी या तीन आरोपींनी धारदार शस्त्राने धीरेंद्र यांच्या हातावर आणि डोक्यावर वार केले आणि घटनास्थळावरुन पळ काढला.  याप्रकरणी धीरेंद्र चौहान यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीनुसार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून या प्रकरणाचा सह पोलिस निरीक्षक संदीप जोरे अधिक तपास करत आहेत.