Uddhav Thackeray Statement: कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा इशारा

कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray Statement: कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, उद्धव ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | (Pic Credit - Facebook)

कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. पक्षाच्या भायखळा कार्यालयात गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलेले सेनेचे कार्यकर्ते बबन गावकर यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. दक्षिण मुंबईतील भायखळा हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या बंडखोर सेनेच्या आमदार यामिनी जाधव यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडणाऱ्या शिंदेंच्या बंडाने गेल्या महिन्यात पक्ष फुटला आहे. हेही वाचा CM Eknath Shinde On Renaming Aurangabad, Osmanabad: संभाजीनगर, धाराशीव नामांतरासाठी कायदेशीर कॅबिनेट घेऊन पुन्हा अधिकृत घोषणा करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. पोलिस दोषींना वठणीवर आणू शकत नसतील तर सेनेचे कार्यकर्ते करतील. पोलिसांनी राजकारणात येऊ नये, असे ठाकरे पुढे म्हणाले.

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2022 07:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).