Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Attack On Vipul Pingle: ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा विश्वासू आणि युवा सेनेचे मराठवाडा सचिव विपुल पिंगळे (Vipul Pingale)यांच्यावर  प्राणघात हल्ला केल्याचे घडना समोर आली आहे. बीडमध्ये (Beed) घडलेल्या या घटनेमुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका अज्ञात टोळक्याकडून त्यांच्यावर हल्ला केला. बीड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली आहे. पोलीसांना कळताच या प्रकरणा संबंधी तपास सुरु करण्यात आला आहे.  बीड परिसरात राजकिय नेत्यावर हल्ला केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

राजकिय वादामुळे त्यांच्यावर हल्ला झाल्याचे प्राथमिक संशय घेण्यात आले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, विपुल विपुल पिंगळे हे कारमधून बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात असताना अचानक सहा ते सात जणांच्या टोळक्यांने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यास सुरुवात केली. अचानक आरोपींनी लाकडी दांडा आणि लोखंजी रॉडने विपुल यांच्या  अंगावर हल्ला केला. या हल्लात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाल्या आहे. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.  बीड जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

विपुल पिंगळे हे राजकिय नेत्यामध्ये आघाडीचे नेते म्हणून ओळखले जाते. आदित्य ठाकरे यांचा विश्वासू नेता मानला जातो. आरोपींनी बीड येथील साठे चौकापासून विपुल पिंगळे यांचा पाठलाग केला.  शिवाजी चौकात येताच त्यांच्या कारमधून बाहेर पडल्यानंतर लगेच त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड करताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी तातडीने पोलीसांना फोन केला. पोलीसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत पुढील चौकशीसाठी प्रक्रिया सुरु केली.