छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey) यांना ED कडून नोटीस पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजने (Pradhan Mantri Awas Yojana) मध्ये निविदांमधील तथाकथित घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आस्तिक कुमार पाण्डेय यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. याच प्रकरणामध्ये यापूर्वी महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांची देखील मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दी मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 40 हजार घरं बांधण्यासाठी 4 हजार कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. पण त्यामध्ये कंपनीकडून घोटाळा घालण्यात आल्याचे आरोप आहेत. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर ईडी ने या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे. ईडीने कंपनीशी निगडीत लोकांवर छापेमारी केली. 9 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणामध्ये ईडी कडून महानगर पालिकेच्या अधिकार्यांचीही चौकशी झाली आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनादेखील नोटीस बजावण्यात आली आहे. आज पाण्डेय त्या प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात येणार आहेत. IAS Officer Transfers in Maharashtra: तुकाराम मुंढे ते जी श्रीकांत यांच्या खांद्यावर पहा आता कोणती नवी जबाबदारी .
समरथ कन्स्ट्रक्शन, इंडोग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जगवार ग्लोबल सर्व्हिसेस या तीन कंपन्यांनी एकाच लॅपटॉपवरुन म्हणजे एकाच IP Address वरुन निविदा भरल्याचे महापालिका आयुक्त अभिजित चौधरी यांच्या लक्षात आले. त्यामुळे महापालिकेच्या घरकुल बांधणीसाठी निविदा भरताना ‘रिंग’ केल्याचा ठपका ठेवत या प्रकरणामध्ये सिटी चौक पोलीस ठाण्यात19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.