Satish Sawant Vs Nitesh Rane | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Kankavli Assembly Constituency Election Results 2019: कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे सतीश सावंत विरुद्ध भाजपचे नितेश राणे असा सामना रंगला आहे. राज्यभरात शिवसेना-भाजप युती असताना कणकवलीत युतीला धक्का बसला. इथल्या संघर्षाला थेट नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना अशी किणार आहे. शिवसेनेकडून सतीश सावंत तर भाजपकडून नितेश राणे रिंगणात आहेत. प्राथमिक कल हातील आले तेव्हा, नितेश राणे हे आघाडीवरती आहेत. नितेश राणे यांना 700 मतांची आघाडी मिळाली आहे. हा अगदीच प्राथमिक कल आहे.

कणकवली मतदारसंघात अत्यंत चुरशीचा सामना आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. राज्यभरातील कल हाती येत आहेत. क्षणाक्षणाला उत्सुकता वाढत आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी पार पडली. त्यानंतर विविध मतदान केंद्रांवरील मतदानाची मोजणी पार पडत आहे. (हेही वाचा,  कर्जत-जामखेड मतदारसंघ: रोहित पवार की राम शिंदे पाहा कोण आघाडीवर)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढतो आहे. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.