Ashadhi Wari: पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाई दर्शन वारकऱ्यांना 24 तास उपलब्ध,  मंदिर स्ट्रस्टचा निर्णय
Vitthal Rukmai (विठ्ठल रखुमाई) (Photo Credits: Twitter)

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर ट्रस्टने विठ्ठलाच्या दर्शनासंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन 24 तास घेता येणार आहे. 26 जुलैपर्यंत विठ्ठलाचं मंदिर 24 तास सुरू असणार असल्याचा निर्णय विठ्ठल मंदिर ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टच्या या बैठकीत मु्ख्यमंत्र्यांना लवकरच विठ्ठलाच्या पुजेचं निमंत्रण दिलं जाणार असल्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीने जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे.  (हेही वाचा -  Ram Temple Chief Priest Laxmikant Dixit Passes Away: राम मंदिराचे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन)

दरम्यान विठ्ठल मंदिरात भाविकांच्या निवाऱ्यासाठी नवा मंडप उभारण्यात आलंय. मंदिरातील बाजीराव पडसाळी इथं हा मंडप उभारण्यात येणार आहे. संपूर्ण अत्याधुनिक पद्धतीने हळव्या वजनाचे लोखंड व पत्र्यांचा वापर करून या मंडपाची उभारणी केली जातेय. त्यामुळे भाविकांना आता काही काळासाठी मंदिरात थांबायला एक चांगली जागा उपलब्ध होणार आहे .

विठ्ठल मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्याचे सुरु असलेल्या कामांपैकी गाभारा , चौखांबी , सोळखांबी, बाजीराव पडसाळी वगैरे भागाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 2 जून पासून भाविकांना विठुरायाचे मूळ दगडी गाभाऱ्यात तर दर्शन घेता येणारच आहे. शिवाय  विठ्ठल मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे हे पुरातन रूप देखील पाहता येणार आहे.