Asaram Bapu (Photo Credit: Facebook)

कोरोना संसर्गातून बरे झालेल्या आसाराम बापूची तब्येत (Asaram Bapu) बिघडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तुरुंग व्यवस्थापनाकडून त्याला पुन्हा एकदा ऐम्समध्ये घेऊन जाण्याची तयारी सुरू केली. मात्र, आसाराम बापूने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र आयुर्वेद यूनिवर्सिटीतून एका डॉक्टरला बोलावण्यात आले आहे. त्याला आता तुरुंगातच ऑक्सिजन दिले जात आहे. रविवारी त्याची ऑक्सिजन पातळी 92 पर्यंत घटली होती. ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. याआधी दोन दिवसांपूर्वी कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला ऐम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापू सध्या राजस्थानमधील जोधपुर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मात्र, रविवारी त्याची ऑक्सिजन पातळी 92 पर्यंत घटली. त्यांनंतर तरूंगातील अधिकाऱ्यांनी त्याला पुन्हा ऐम्स रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी दर्शवली. परंतु, आसारान स्पष्ट नकार देत आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवले. ज्यामुळे प्रशासनाने करवडच्या आयुर्वेदिक युनिव्हर्सिटीच्या डॉ. अरूण त्यांगी त्यांना बोलवून घेते. त्यागी यांनी आसारामची तपासणी करून त्याला काही औषधे घेण्यास सांगितले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. हे देखीला वाचा- मुंबई महानगरपालिकेचा mf असा उच्चार करणा-याला BMC ने दिले चतुराईने उत्तर, नेटिजन्सकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

डॉ. त्यागी यांनी सांगितले की, कोरोनामुळे आसारामला काही त्रास जाणवत आहे. त्याचा उपचार करण्यासाठी काही तपासणी करणे आवश्यक आहे. यातील काही तपासणी केवळ रुग्णालयातच करता येणार आहे. ज्यामुळे त्याला रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आसाराम बापूने आपल्या आरोग्याचे कारण पुढे करत राजस्थान उच्च न्यायालयाकडे जामीन अर्ज केला होता. परंतु, वैद्यकीय उपचार घेऊन बरे वाटल्यांनतर आसाराम बापू याला पुन्हा तुरुंगात दाखल करा असे आदेश देत उच्च न्यायालयाने आसाराम बापू याची याचिका फेटाळून लावली होती. तसेच आसाराम बापूचे वाढते वय लक्षात घेता आणि त्याच्यावर सुरु असलेल्या वैद्यकीय उपचार, आहार आणि सुरक्षीतता याबाब अधिक काळजी घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.