Arun Gawli Daughter Wedding: योगिता गवळी-अक्षय वाघमारे यांचा आज विवाहसोहळा; हळदीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल
Yogita Gawli Akshay Waghmare Wedding | Photo Credits: Instagram/ Akshay Waghmare

Yogita Gawli Akshay Waghmare Wedding Photos: गॅंगस्टर आणि माजी आमदार अरूण गवळी (Arun Gawli) यांची लेक योगिता गवळी (Yogita  Gawli) आज अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरस लॉकडाऊन असल्याने आता सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. आज विवाहबंधनात अडकणार्‍या या जोडप्याच्या लग्नापूर्वीच्या काही विधींचे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये योगिता आणि अक्षयच्या हळदीच्या, अक्षयच्या मेहेंदीचे फोटो सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल झाले आहेत. योगिता आणि अक्षय जुने मित्र असून सुरूवातीला मैत्री आणि नंतर प्रेमात पडलेलं हे जोडपं आज विवाहबंधनात अडकणार आहे.

डिसेंबर 2019 मध्ये अक्षय आणि योगिताचा पुण्यामध्ये खजागीत साखरपुडा पार पडला होता. त्यावेळेसही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा झाला आहे. आजही मुंबईतील भायखळा मध्ये दगडी चाळी मध्ये अक्षय-योगिता विवाहबंधनात अडकतील. अरुण गवळी याची कन्या योगिता गवळी हिचा अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी साखरपुडा.

अक्षय योगिताच्या हळदीचे फोटो

 

View this post on Instagram

 

हळद 💛 . #quarantinwedding #weddingvibes #

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

अक्षयच्या मेहंदीचे फोटो

 

View this post on Instagram

 

मेहंदी 🙌 #weddingvibes #thank #you #punepolice #mumbaipolice #quartinewedding

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

अक्षय वाघमारे हा मराठी सिनेसृष्टीत अभिनेता असून त्याने ‘फत्तेशिकस्त’, ‘बेधडक’, ‘दोस्तीगिरी’ आणि ‘बस स्टॉप’अशा काही मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. फेब्रुवारी महिन्यात होणारा हा विवाह सोहळा लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आला. पण भारतात लॉकडाऊन कायम राहिल्याने अखेर आज लॉकडाऊनमध्येच विवाहबंधनात अडकण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.