Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेना भवनासमोर 33000 रुद्राक्षांनी साकारले हुबेहुब बाळासाहेब! (Photos)
Balasaheb Thackeray portrait made up of 33,000 Rudrakshas (Photo Credit: ANI)

Bal Thackeray Jayanti 2019: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज 93 वी जयंती. हेच औचित्य साधून एका कलाकाराने चक्क 33000 रुद्राक्षांनी शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा साकरली आहे. चेतन राऊत (Chetan Raut) असं या कलाकाराचं नाव असून तो मुंबईतला आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्याने ही अनोखी शक्कल लढवली. मुंबईतील शिवसेनाभवनासमोर ही भव्यदिव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. (बाळासाहेब ठाकरेंना या 3 नेत्यानी दिली सर्वात जास्त यातना)

8 बाय 8 फूट आकारात 33000 रुद्राक्षांचा वापर करुन ही प्रतिमा साकारण्यात आली आहे. चेतन राऊत हा जे. जे. स्कूल ऑफ ऑर्ट्सचा विद्यार्थी आहे. बाळासाहेबांचं रुद्राक्षासोबतचं नातं लक्षात घेत रुद्राक्षांनी प्रतिमा साकारण्याचे त्याने ठरवले. 10 सहकार्यांच्या मदतीने त्याने ही प्रतिमा साकारण्याची किमया साधली. त्याचबरोबर ही प्रतिमा साकारुन 'वर्ल्ड रेकॉर्ड' साधण्याचा प्रयत्न असल्याचेही या कलाकाराने सांगितले.

यापूर्वी रांगोळी, चित्र साकारात अनेक कलाकारांनी बाळासाहेबांप्रती असलेले प्रेम, श्रद्धा दाखवली होती. मात्र रुद्राक्षांनी प्रतिमा साकारण्याचा हा आगळावेगळा असा पहिलाच प्रयत्न आहे.