राज्यातील कुठलाही सरपंच हा सध्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार- नारायण राणे
Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

राज्य सरकारवर टिका करण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडत नाही. यातच भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली आहे. "राज्यातील कुठलाही सरपंच हा सध्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा हुशार आहे. कारण, राज्यातील कुठल्याही सरपंचाला कायद्यांची माहिती जास्त आहे." अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टिका केली आहे. तसेच पोहरादेवी गडावर कोरोनाचे नियम मोडून संजय राठोड यांना पाहायला केलेल्या गर्दीवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काय कारवाई करणार असा सवालही नारायण राणे यांनी विचारला आहे. मिडियाशी बोलताना नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र सोडले आहे.

"एखाद्या समाजाने जो विकासकामं करतो त्याच्या मागे जावं. बलात्काऱ्यांच्या मागे समाजानं जाऊ नये, या प्रकरणातील एवढ्या क्लिप बाहेर आल्या पण अद्याप काहीही कारवाई केली नाही. कारवाई केली तर लोक आपल्याला सोडून जातील, अशी भीती या सरकारला आहे असे सांगत पूजा चव्हाण प्रकरणात पुढे आलेले नाव संजय राठोड प्रकरणावर नजर टाकत राज्य सरकारवर निशाणा साधला.हेदेखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना चपलेने झोडले पाहिजे; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा घणाघात

पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं. ते पंधरा दिवसांपासून फरार होते. नंतर ते बाहेर पडले आणि मंदिरात गेले. मंदिरात जायला ते संत आहेत का? असा खोचक सवाल विचारतानाच आरोपांना उत्तरं द्या पळताय कशाला, अशा शब्दात नारायण राणे यांनी राठोडांना आव्हान दिलं आहे. सरकार विनयभंग, बलात्कार, हत्या प्रकरणातील लोकांना पाठीशी घालत आहे. सुशांतसिंग, दिशा सालियान, पूजा चव्हाण प्रकरणातील आरोपींनाही पाठीशी घालत आहेत. या सरकारला तसं लायसन्स दिलं आहे का?, असा सवालही राणेंनी केला आहे.