Anvay Naik Family

एखाद्या व्यक्तीच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या सापडणे ही नक्कीच गंभीर बाब आहे. त्याची चौकशी व्हायला पाहिजे. परंतू, अन्वय नाईक (Anvay Naik Suicide Case) प्रकरणात तीन वर्षे होत आली. आमच्या दोन माणसांचा मृत्यू झाला आहे. तरीसुद्धा आम्हाला न्याय मिळू शकला नाही, न्याय फक्त श्रीमंत व्यक्तींनाच मिळणार का? असा उद्विग्न सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी (Anvay Naik Family) उपस्थित केला आहे. अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्या पत्नी आणि मुलीने आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्या बोलत होत्या.

मनसुख हिरेन प्रकरणात काही तासांमध्ये कारवाई केली जाते. आमच्या (अन्वय नाईक) प्रकरणाला तर तीन वर्षे झाली. तरीही अद्याप विशेष कारवाई झाली नाही. काही प्रकरणात तातडीने सीडीआर काढला किंवा मिळवला जातो. तेही विरोधी पक्षात असताना. असाच सीडीआर आम्हाला का मिळाला नाही, असा सवालही अन्वययनाईक कुटुंबीयांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरणात सचीन वाझे यांचा सीडीआर सभागृहात वाचून दाखवला होता. याच मुद्द्यावरुन अन्वय नाईक कुटुंबीयांनी सवाल उपस्थित केले. (हेही वाचा, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबलं– गृहमंत्री अनिल देशमुख)

आगोदरच्या सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबून टाकले. या प्रकरणाील गुन्हेगारांना सरकारने स्पेशल ट्रीटमेंट दिली. इतकेच नव्हे तर पोलिसांनीही त्याला विशेष सेवा देत त्याचा जबाब नोंदवला असा आरोप अन्वय नाईक कुटंबीयांनी केला. आमच्या प्रकरणात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. असे असताना त्या वेळी विधानसभा का हादरवून टाकण्यात आली नाही, आसीह सवाल नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केला.

किरीट सोमय्या यांचा जीव का वरखाली होतो आहे?

जमीन खरेदी करणे विकणे हा आमचा व्यवसाय आहे. आम्ही कोणालाही जमीनी विकू शकतो. मग ते मंत्री असतील अथवा फळ विक्रेते. जमीन व्यवहाराचा आणि अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा संबंधच येतो कुठे? ज्या सातबारांवरी नावे पाहून किरीट सोमय्या यांचा जीव वर खाली होतो त्याचे कारण काय आहे? आम्ही आमचे बँक डिटेल्स आणि जीमीन व्यवहारांचे सर्व कागदपत्र द्यायला तयार आहोत. इतर मंत्र्यांनीही त्यांचे जमीन व्यवहार आणि बँक डिटेल्स द्यावेत, असे आव्हान अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने या वेळी दिले.

राज्यातील आगोदरच्या सरकारने आणि आताच्या विरोधी पक्षाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात दिशाभूल केली आहे, असाही आरोप करण्या आला.