महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा नववा दिवस आज चांगलाच गाजला. या अधिवेशनात 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण (Anvay Naik Case) दाबण्यात आलं,' असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) व शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज विधानसभेत केला. या विधानामुळे विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "माझी खुशाल चौकशी करा, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही" अशी प्रतिक्रिया दिली.
अन्वय नाईक प्रकरण हा मुद्दा सर्वप्रथन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडला. "2018 मध्ये अन्वय नाईक व त्यांच्या आईने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकलं. त्यानंतर हे प्रकरण या सरकारकडे आलं, अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं की, माझ्या नवऱ्याने व सासुने आत्महत्या केलेली आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण दाबलेलं आहे, असं त्यांनी सांगितलं आणि त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी सुरू केली. ती चौकशी सचिन वझे करत होते. सचिन वझेंकडे ही चौकशी राहू नये, ही जर चौकशी झाली तर माजी मुख्यमंत्री अडचणीत येतील. म्हणून सचिन वझेला टार्गेट केलं जातंय. त्यामुळे सचिन वझेंना अजिबात काढायचं नाही, यांचीच चौकशी होईल म्हणून हे असं करत आहेत." असेही त्यांनी सांगितले.हेदेखील वाचा- Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन मृत्युप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांना अटक करा- देवेंद्र फडणवीस
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, "या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. हे भास्कर जाधव यांना माहिती नाही. भास्कर जाधव आम्हाला धमक्या द्यायच्या नाही, आम्ही धमक्यांना घाबरणारी लोकं नाहीत. करा आमची चौकशी, आम्ही धमक्यांना घाबरत नाही. पण सचिन वाझेवर कारवाई का नाही?"
त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील "अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तक्रार त्यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे, अन्वय नाईक प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना दाबलं." असं बोलून भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपास दुजोरा दिला.
"माझं खुलं आव्हान आहे की माझी चौकशी करा. कर नाही त्याल डर कशाची. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे" असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले. यानंतर सभागृहात झालेल्या गोंधळामुळे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले.