Buldhana: डिजे बंद केल्याचा राग, जमावाकडून थेट पोलीस स्टेशनवर हल्ला
Police (Photo Credit: Twitter)

कायदा व सुव्यस्थेचे पालन करत असताना कारवाई करत बुलढाणा (Buldhana) पोलिसांनी एका कार्यक्रमाचा डीजे बंद केला. मध्यरात्री उशीरपर्यंत डीजे सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होत होते. त्यामुळे पोलीसांनी कारवाई करत डीजे (DJ) बंद केला. या वेळी चिडलेल्या जमावाने थेट पोलीस स्टेशनवरच हल्ला (Anti-Social Attack) केला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस (Shegaon Police Station) स्टेशनमध्ये घडली. घडल्या प्रकारामुळे परीसरात खळबळ उडाली आहे तसेच, चर्चाही सुरु आहे.

मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास मोठ्याने डीजे लावून पार्टी सुरु असल्याची माहिती शेगाव पोलिसांना प्राप्त झाली. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता माहितीत सत्यता आढळून आली. पोलिसांनी डीजे बंद करायला लावला आणि आयोजकांना समज देऊन ते तिथून निघून गेले. त्यानंतर काही वेळातच जवळपास 30 जणांचा जमाव पोलीस स्टेशनवर धावून आला. अज्ञातांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. दगडफेक करत कचेरीतील सामनाची तोडफोड केली. (हेही वाचा, Omicron Scare in Maharashtra: 55 वर्षांवरील पोलिस दलातील कर्मचार्‍यांना Work From Home चा पर्याय)

जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. जमावेने केलेल्या तोडफोडीत पोलीस ठाण्यातील खुर्च्या, टेबल, कपाट यांसारखे फर्निचरचे नुकसान झाले. खिडकीच्या काचाही मोठ्या प्रमाणावर फुटल्या. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पोबारा केला असून, पोलीस आरोपींचा शोध गेत आहे. समजकंटकांनी थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केल्याने आता पुढील कारवाई काय होते, याबातब नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.