Fishing boat hit cargo ship (फोटो सौजन्य - ट्विटर)

Mumbai Boat Accident: मुंबईजवळच्या समुद्रात आणखी एक बोट अपघात (Boat Accident) झाला. या अपघातात मच्छिमारांची बोट (Fishing Boat) मालवाहू जहाजाला (Cargo Ship) धडकली. मात्र, या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. शनिवारी रात्री उशिरा मच्छिमारांची बोट चीनच्या मालवाहू जहाजाला धडकली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

नौदल आणि तटरक्षक दलाकडून बचावकार्य -

मालवाहू जहाजाला धडक दिल्यानंतर मच्छीमारांची बोट समुद्रात बुडू लागली. मच्छिमारांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. बुडालेल्या बोटीला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या मच्छीमारांच्या बोटी दाखल झाल्या. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि तटरक्षक दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले. (हेही वाचा -Mumbai Boat Accident: मुंबईच्या समुद्रातील बोट अपघातातील 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला: मुंबई पोलीस)

मच्छिमार बोट आणि मालवाहू जहाजाची धडक, पहा व्हिडिओ -

बोट दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही -

प्राप्त माहितीनुसार, तटरक्षक दल काल रात्रीपासून मच्छिमारांना मदत करत आहे. या संपूर्ण घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. (हेही वाचा - Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! बोटिंगचे नियम बदलले; पर्यटकांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन)

18 डिसेंबर रोजी मोठी दुर्घटना -

याआधी 18 डिसेंबर रोजी मुंबई किनारपट्टीजवळ नौदलाच्या बोटीने प्रवासी बोटीला धडक दिली होती. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला होता. नौदलाचे जहाज इंजिन चाचणीसाठी निघाले होते, मात्र दुपारी 4 वाजता त्याचे नियंत्रण सुटले आणि ते नीलकमल नावाच्या बोटीला धडकले. ही बोट गेटवे ऑफ इंडिया येथून प्रवाशांना प्रसिद्ध पर्यटन स्थळ 'एलिफंटा' बेटावर घेऊन जात होती.