Election Results | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Gram Panchayat Bypolls Election 2023: राज्यभरातील सुमारे 2 हजार 620 ग्रामपंचायतीतील (Gram Panchayat) 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी (Bypolls Election) घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी 18 मे 2023 रोजी मतदान पार पडणार आहे.

राज्याभरातील ग्रामपंचायतीमधील 3 हजार 666 सदस्य आणि 126 थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. या रिक्त पदासाठी उमेदवार 25 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत उमेदवारी अर्ज भरू शकतात. 3 मे 2023 रोजी या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल. तसेच उमेदवार 8 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेऊ शकतात. (हेही वाचा - CM Employment Generation Programme: राज्यात बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर; एक लाखाहून अधिक युवकांना मिळणार काम)

दरम्यान, या जागांसाठी 18 मे 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. याशिवाय 19 मे 2023 रोजी मतमोजणी केली जाईल. राजीनामा, निधन, सदस्यत्व रद्द किंवा इतर कारणांमुळे ही पद रिक्त झाली आहेत. त्यामुळे या रिक्त जागेवर पोटनिवडणुक होणार आहे.

तथापी, ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या जागांवर जनतेचा कौल कौणाला मिळणार? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.