ग्रामसभेमध्ये राळेगण-सिद्धी परिवाराने अण्णांचे 84 वय इतके असताना आता उपोषण आंदोलन करू नये अशी विनंती केली त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (By state excise officials) काल शनिवारी अण्णांची भेट घेऊन एक लेखी पत्र अण्णांना दिले आहे. त्या पत्रात राज्य सरकारने वाईन विक्री (Wine sales in the store) याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नसून नागरिकांचे मते आजमावून त्यानंतर यावर अंतिम निर्णय होणार आहे आणि त्यानंतर सरकार याबाबतची घोषणा करणार आहे, तूर्तास याबद्दल सरकारने वाईन विक्रीला सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये परवानगी अद्याप दिली नसल्याचे स्पष्ट केलेला आहे.
अण्णा हजारेंनी राज्य सरकारला प्रश्न
काही दिवसा आगोदर अण्णांनी वाईन विक्री विरोधी प्रश्न उपस्थित केला होता कि मार्केटमध्ये आधीच इतक्या प्रमाणात दारुची दुकानं आहेत, त्यात तुम्ही आणखी वाढवत आहात, तुम्हाला सर्वच लोकांना व्यसनाधीन बनवायचं आहे का?, असा प्रश्न अण्णा हजारेंनी राज्य सरकारला विचारला आहे. लोकं व्यसनाधीन झाले की राज्य सरकारला जे साधायचं असेल ते साधता येईल, म्हणून हा निर्णय घेतल्याची टीका त्यांनी केली. तसेच बालकं जर दारूच्या आणि वाइनच्या अधीन गेलीत तर आपल्या देशाचं काय होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. (हे ही वाचा Devendra Fadnavis on Aditya Thackeray: खंजीर कोणी खुपसला? आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर)
कोणताही निर्णय घेऊन जनतेवर लादू नये
यापुढे शासनाने स्वत:हून कोणताही निर्णय घेऊन जनतेवर लादू नये, अन्यथा ग्रामसभा आंदोलन करू. केवळ राळेगणसिद्धीच नाही तर राज्यातील सर्वच गावात असा निर्णय घ्या. यापुढे शासनाने प्रत्येक ग्रामसभेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असा निर्णय राळेगणसिद्धी ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच येत्या तीन महिन्यांत दारूबाबत जनतेचे मत जाणून घ्या, लोकांनी नाही म्हटले तर निर्णय रद्द करा,' असे अण्णा हजारे म्हणाले.