ST Employees Strike: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. आज ही कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले गेले. अशातच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर राज्य सरकाराने सहानुभूतीपूर्वक विचार केला आहे. तर विलिकरणाची मागणी सोडल्यास राज्य सरकारने अन्य सर्व मागण्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा.
सध्या हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर त्यासंदर्भातील कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही पालन केले. त्यामुळे जर कोर्टाचा अवमान करुन हा संप केला जात असेल तर आता कारवाई केली जाईल. त्यामुळेच राज्य सरकार दाखल करणार अवमान याचिका दाखल करणार असल्याचे अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. त्याचसोबत एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे ही परब यांनी म्हटले. कोरोनाच्या काळात महामंडळाला मोठा फटका बसल्याचे परब यांनी सांगितले. त्याचसोबत महामंडळ 12 हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात असल्याचे ही परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. (MSRTC Employees Strike: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप, एकूण 223 आगारातील बससेवा बंद)
दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारने खासगी बस चालक, शाळेच्या बसेस, खासगी कंपन्यांच्या बसेस या सामान्य माणसांच्या प्रवासासाठी सुरु करण्यास परवानगी दिली. परंतु जर उच्च न्यायालयाचा मनाई आदेश डावळून जर संप सुरुच राहिल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आता अवमान याचिका दाखल करणार आहे.