प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या शिधावाटप नियंत्रक विभागाचे दक्षता पथक बर्खास्त केल्याचा दावा अनिल महाजन यांनी केला आहे. अनिल महाजन हे गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक आहेत. महाजन यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात त्यांनी दावा केला आहे की, महाजन यांनी 25 एप्रिल रोजी शिधावाटप नियंत्रक विभाग संदर्भात एक लेख लिहिला होता. ज्याची दखल घेऊन शासनाने शिधावाटप नियंत्रक विभागाचे दक्षता पथक बरखास्त केले आहे.
महाजन यांच्या पत्रकानुसार, 26 एप्रिल 2023 रोजी श्री बगाटे या अधिकाऱ्यांच्या सहिने एक आदेश काढण्यात आला. ज्यामध्ये शिधावाटप नियंत्रक विभागाचे दक्षता पथक बरखास्त करण्यात आल्याचे म्हटले आहे. या पथकातील काही लोकांमुळे शिधावाटप नियंत्रक विभागाची व अन्न व नागरी पुरवठा विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. बरखास्त करण्यातआलेल्या भरारी पथकात पवनकुमार यादवराज कुंभले, राहूल रामचंद्र इंगळे, प्रभाकर छगन चौगुले, दिपक सुभाष कदम, सुधीर विश्वनाथ गव्हाणे, राजीव शिवदास भेले, राजेंद्र अरुण पाटील, मच्छिंद्र कुटे यांचा समावेश होता.
दरम्यान, वृत्ताची दखल घेऊन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर समाजातून कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.