Anil Deshmukh Receives Threat Calls: कंगना रनौत ची ड्रग्स टेस्ट घेण्याचे आदेश देताच गृहमंंत्री अनिल देशमुख यांंच्या कार्यालयात धमकीचा फोन
Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: Facebook)

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत काल महाराष्ट्र राज्य गृहमंंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांंनी कंंगना रनौत (Kangana Ranaut)  हिची सुद्धा ड्रग्ज टेस्ट होणार असल्याचे सांंगत मुंंबई पोलिसांंना (Mumbai Police)  सुद्धा याच संदर्भात आदेश सुद्धा दिले होते. याबाबत एकीकडे अनिल देशमुख यांंनी भाष्य करताच त्याच्या काही वेळानंंतरच त्यांंच्या नागपुर (Nagpur)  येथील कार्यालयात धमकीचे फोन यायला सुरुवात झाली. या संदर्भात अनिल देशमुख यांच्या कार्यालयातील अधिकार्‍यांंनी माहिती दिली, हे फोन कुठुन आले होते, कोणी केले होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. यापुर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांंना सुद्धा अशाच प्रकारचे धमकीचे फोन आले होते त्या कॉल्सचा संबंंध कुख्यात अंडरवर्ल्ड गुंंड दाउद इब्राहिम याच्याशी असल्याच्या चर्चा सुद्धा होत्या.

काल महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान अनिल देशमुखांनी मुंंबई पोलिसांंना कंंगनाची सुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यावेळी अध्ययन सुमन यांनी कंगना रनौत ड्रग्ज घेते आणि ती मला देखील घेण्यास जबरदस्ती करत होती असा खबळजनक आरोप केला होता. त्याचा दाखला सुद्धा देशमुख यांंनी दिला होता.

ANI ट्विट

दरम्यान, कंंगना रनौतने सुद्धा काल अनिल देशमुख यांंच्या विधानावर प्रतिक्रिया देत जर का माझी चाचणी झाली तर आनंंदच आहे, मी जर दोषी आढळले तर मान्य करेन आणि मुंंबई कायमची सोडेन असेही कंंगना म्हणाली होती. आज कंंगना मुंंबईत परतणार आहे यासाठी ती हिमाचल प्रदेश च्या मुळगावहुन निघाली आहे.