Andheri Fire: कामगार रुग्णालयातील भीषण आग प्रकरणी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits PTI)

Andheri Fire: अंधेरीतील कामगार रुग्णालयात सोमवारी भीषण आगीचे साम्राज्य पाहायला मिळाले. या आगीमागील प्राथमिक कारण शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचे सांगितले जात होते. तर रुग्णलयाला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला असून त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खंत व्यक्त करत लागलेल्या आगी प्रकरणी कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी आज कामगार रुग्णालयातील मृतांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (Jagat Prakash Nadda) यांच्याशी बातचीत केली आहे. तर फडणवीस यांनी मृतांबद्दल शोककळा व्यक्त केली आहे. (हेही वाचा-Andheri Fire: अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील आगीनंतर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन)

मात्र रुग्णालयाकडे नोव्हेंबर 2018 रोजीच महापालिकेने आपत्कालन विभागाने रुग्णालयातील संपूर्ण यंत्रणेची माहिती देण्यास वारंवार सांगितले होते. मात्र रुग्णालयाने महापालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे ही म्हटले जात आहे.