Andheri Fire: अंधेरी येथील कामगार रुग्णालयातील आगीनंतर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन
कामगार रुग्णालय (फोटो सौजन्य- ANI)

Andheri Fire: अंधेरी कामगार रुग्णालयाला सोमवारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामध्ये कालच्या माहितीनुसार 6 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा 8 वर जाऊन ठेपला आहे. त्यामुळे रुग्णालयाचा बाहेर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच सरकारला खडसावत 'लगी आग अंधेरी में प्रशासन सोया दिल्ली में' असे फलक घेऊन उभे राहताना दिसून आले आहे.

कामगार रुग्णालयात सोमवारी चार वाजताच्या सुमार भीषण आगीची धक्कादायक घटना घडली आहे. तर चौथ्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरच्या जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र रुग्णालयात सोईसुविधांचा अभाव असल्याने  आज रुग्णालयातील कर्मचारी संताप व्यक्त करत असून त्यांनी रुग्णालयाच्या आवारात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.( हेही वाचा- Andheri Fire: अंधेरी येथील कामगार हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, 147 जण जखमी)

मात्र रुग्णालयाकडे नोव्हेंबर 2018 रोजीच महापालिकेने आपत्कालन विभागाने रुग्णालयातील संपूर्ण यंत्रणेची माहिती देण्यास वारंवार सांगितले होते. मात्र रुग्णालयाने महापालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे ही म्हटले जात आहे.