Murji Patel, Rutuja Latke | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly Bypoll) अखेर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankul) यांनी नागपूर (Nagpur ) येथे ही घोषणा केली. बावनकुळे यांनी म्हटले की, मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक भाजप लढवणार नाही. त्यामुळेत्यांचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) उमेदवारी अर्ज मागे घेतील. भारतीय जनात पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत. राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला असला तरी, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke यांचा विधानसभेवर जाण्याचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. असे असले तरी अद्यापही 12 उमेदवारांचे अर्ज कायम आहेत. त्यामुळे लटके यांचा विधानसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अद्यापही कमीच आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल हे दोन उमेदवार प्रबळ होते. त्यामुळे मुख्य लढत ही या दोन उमेदवारांमध्येच होणार हे निश्चीत होते. मात्र, आता मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेतला जाणार असल्याने ऋतुजा लटके याच प्रबळ उमेदवार रिंगणात असणार आहेत. (हेही वाचा, Andheri East Assembly Bypoll: लढायचं की मागे फिरायचं? देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिकार, अंधेरी पोटनिवडणुकीवरुन भाजपची हायहोल्टेज बैठक)

अर्ज वैध ठरलेले उमेदवार

ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी) ,राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी),बाला व्यं कटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स), मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी), चंदन चतुर्वेदी (अपक्ष),चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष),निको लस अल्मेडा (अपक्ष),नीना खेडेक र (अपक्ष), पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष), फरहाना सिराज सय्यद (अपक्ष),मिलिंद कांबळे (अपक्ष), राजेश त्रिपाठी (अपक्ष),शकिब जाफ र ईमाम मलिक (अपक्ष)

ट्विट

दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके तर भारतीय जनता पक्षाकडून (BJP) मुरजी पटेल रिंगणात होते. पटेल यांची उमेदवारी मागे घेण्याबाबत भाजपवर दबाव मोठ्या प्रमाणावर वाढत होता. एका बाजुला पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवताना केलेले राजकारण आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजकारणातील काही संकेत यावरुन भाजपची गोची झाली होती. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दिलेला उमेदवार कायम ठेवायचा की मागे घ्यायचा याबाबत भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरु होती. याच पार्श्वभूमीवर रविवारी (16 ऑक्टोबर) रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीतही लढायचं की माघार घ्यायची? हाच सूर होता. दरम्यान, या बैठकीत निर्णयाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भाजप काय निर्णय घेतो याबाबत उत्सुकता होती. अखेर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला आहे.