File image of devotees immersing the Ganesha idol | (Photo Credits: PTI)

पुणे शहरामध्ये आज (12 सप्टेंबर) गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक आणि प्रशासन सज्ज झाले आहे. पुण्यातील मानाचे 5 गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर दगडूशेठ गणपतींसह इतर मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आता वाहतूक सेवेमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे गणेश विसर्जन आणि सामान्य नागरिकांना रहदारीसाठी मार्ग मोकळे ठेवण्यात आले आहेत. सकाळी 10 च्या सुमारास पुणे शहरात विसर्जन मिरवणूका निघण्यास सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 7000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. Happy Anant Chaturdashi 2019 Images: अनंत चतुर्दशी निमित्त मराठी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या गणपती बाप्पाला निरोप!

पुण्यातील 17 रस्ते ठराविक अंतरावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यावेळी पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोडही तयार करण्यात आला आहे.

Pune Police Tweet 

पुण्यामध्ये कोणत्या मार्गामध्ये करण्यात आले बदल?

  • शिवाजी मार्गावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक वाहतूक बंद
  • बाजीराव रोडवर बजाज पुतळा चौक ते फुटका बुरुज चौकापर्यंत वाहतूक बंद
  • कुमठेकर रोडवर टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौकापर्यंत वाहतूक बंद
  • गणेश रोड दारूवाला पुल ते जिजामाता चौकापर्यंत वाहतूक बंद
  • केळकर रोडवर बुधवार चौक ते अलका टॉकीज पर्यंत वाहतूक बंद
  • टिळक रोडवर जेधे चौक ते टिळक चौकापर्यंत वाहतूक बंद
  • शास्त्री रोडवर सेनादत्त चौकी ते अलका टॉकीज पर्यंत वाहतूक बंद
  • जंगली महाराज रोडवर जाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौकात वाहतूक बंद
  • कर्वे रस्त्यावर नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौकात वाहतूक बंद
  • फर्ग्युसन रोडवर खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज में गट पर्यंत वाहतूक बंद
  • भांडारकर रस्त्यावर पीवायसी जिमखाना ते गुडलक चौकापर्यंत वाहतूक बंद
  • सातारा रोडवर व्होळगा चौक जेधे चौकात वाहतूक बंद
  • प्रभात रोडवर डेक्कन पोलीस स्टेशन ते शेलार मामा चौकात वाहतूक बंद
  • सोलापूर रोडवर सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौकात वाहतूक बंद

पुण्याच्या रस्त्यांवर पोलिस प्रशासनासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे देखील लक्ष ठेवून आहेत. तसेच यंदा वेळेत गणेश विसर्जन पूर्ण करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. पुण्याच्या रस्त्यांवर भव्य रांगोळीच्या पायघड्या घालत विसर्जन मिरवणूकांचं स्वागत केले जाणार आहे.