Man Cuts College Girl's Hair At Dadar Station (फोटो सौजन्य - ट्विटर)

Man Cuts College Girl's Hair At Dadar Station: मुंबईतून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. दादर रेल्वे स्थानकावर (Dadar Railway Station) सोमवारी एका व्यक्तीने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापून (Man Cuts College Girl's Hair) घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने 2017 च्या 'चोटी कटवा' (Choti Katwa) च्या भीतीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये महिलांचे केस कापल्याच्या अनेक घटना त्यावेळी नोंदवण्यात आल्या होत्या.

अज्ञात व्यक्तीने कापले महाविद्यालयीन तरुणीचे केस -

प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील एका सुप्रसिद्ध महाविद्यालयातील पीडित विद्यार्थिनी महिलांसाठी असलेल्या विशेष लोकल ट्रेनमधून कल्याण ते माटुंगा रोड (डब्ल्यूआर) असा प्रवास करत होती. ती सकाळी 9.29 च्या सुमारास दादर स्थानकावर पोहोचली. ती पश्चिम रेल्वेच्या फूट ओव्हर ब्रिजकडे चालत असताना अज्ञात व्यक्तीने विद्यार्थीनीचे केस कापले. (हेही वाचा -Torres Jewellery Scam: हिरे आणि गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील हजारो लोकांची फसवणूक; गुंतवणूकदारांचा टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ)

पीडित विद्यार्थीनीची GRP पोलिसांत तक्रार -

पीडित विद्यार्थीनीने रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देताना सांगितले की, बुकिंग काउंटरजवळून जात असताना सकाळी 9:31 च्या सुमारास तिला काहीतरी टोचल्यासारखे वाटले. तिने मागे वळून पाहिलं तर एक अनोळखी माणूस पाठीवर दप्तर घेऊन घाईघाईने चालताना दिसला. त्यानंतर तिने जमिनीवर केसांचे निरीक्षण केले आणि तपासल्यावर लक्षात आले की तिचे अर्धे केस कापण्यात आले होते. (हेही वाचा -Thane Crime: कुत्र्याच्या भुंकण्यावरून वाद, महिलांची भाजीविक्रेत्याच्या घरावर दगडफेक, मारहाण; 10 जणींविरुद्ध गुन्हा दाखल)

दरम्यान, पीडितेने तत्काळ दादर (WR) च्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सला (RPF) घटनेची माहिती दिली, ज्याने तिला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज दाखवले आणि तिला FIR दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पीडिता मुंबई सेंट्रल जीआरपीकडे गेली, जिथे तिची तक्रार PNC क्रमांक 3/2025 U/S 133 BNS अंतर्गत नोंदवण्यात आली. तथापी, जीआरपीने नंतर एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून या धक्कादायक कृत्यासाठी त्याला जबाबदार धरले आहे. पोलिस या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी चौकशी करत आहे.

काय आहे छोटी कटवा प्रकरण -

2017 मध्ये 'चोटी कटवा' घटनांनी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण केली होती. या प्रकारामुळे अनेक महिलांना बाहेर पडताना केस झाकावे लागत होते. तथापी, आता दादर येथे घडलेल्या घटनेमुळे शहरातील महिलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता लोकलने प्रवास करताना किंवा इतर ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.