ST Workers Strike : सह्याद्री अतिथीगृहावरील महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, अनिल परब यांनी दिली 'ही' माहिती
Anil Parab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRCT) कर्मचाऱ्यांचा संप आज शनिवारीही सुरु आहे. महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे (ST Employees Strike) राज्यातील सर्व 250 बस डेपो बंद आहेत. या पार्श्वभूमीवर आज(शनिवार) सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बैठक झाली. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात ही बैठक पार पडली. त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

समितीचा अहवाल जर लवकर देता आला तर तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील. समितीचा जर विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर शासन तो मंजूर करेल. परंतु जर समितीने नकारात्मक अहवाल आला तर त्यावर चर्चा करण्यात येईल. तसेच बरऱ्याच दिवसापासुन एसटी करमचाऱ्यांचा  वेतन वाढीचा प्रश्न अजुनही प्रलंबित आहे त्यामुळे इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे सर्व गोष्टी करायच्या असतील तर, एकंदरीत अभ्यास करून निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे. असे अनिल परब यांनी सांगितले. (हे ही वाचा ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटण्याची शक्यता; मंत्री अनिल परब यांनी घेतली शरद पवारांची भेट, झाली महत्वाची चर्चा)

कामगारांशी चर्चेसाठी  कामगारांचं शिष्टमंडळ गेलेले आहेत आणि कामगारांशी चर्चा करून पुन्हा एकदा भेटण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. मी माझ्याकडून सर्व प्रयत्न केलेले आहेत. संपकरी कामगारांनी संप लवकरात लवकर संप थांबवून कामावर येण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कृपया हा संप अधिक वाढवू नये. कारण, एसटी अत्यंत नुकसानीत आहे. तिला त्यातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला कामगारांनी देखील मदत केली पाहिजे.”