Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Nagpur: महाराष्ट्रातील नागपूर येथील रुग्णालयात कोरोनामुळे (Coronavirus) एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली आणि रुग्णालयाला आग लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी घडली. रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णालय प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. रुग्णालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे.

डीसीपी लोहित मातानी या संदर्भात बोलताना सांगितलं की, होप हॉस्पिटलमध्ये एका 29 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर त्या महिलेचा नवरा आणि तिच्या मित्रांनी प्रथम डॉक्टरांशी वाद केला आणि नंतर नातेवाईकांच्या मदतीने रिसेप्शन क्षेत्रात तोडफोड केली. (वाचा - Maharashtra New Corona Guidelines: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आजपासून कडक निर्बंध लागू; काय सुरू, काय बंद राहणार जाणून घ्या)

मातानी यांनी पुढे सांगितले की, यातील एकाने पेट्रोल आणले आणि रिसेप्शन टेबलला आग लावली. त्यानंतर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ही आग विझविली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी 11 आरोपींपैकी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयाने कोरोनाग्रस्त महिलेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. मृत्यूनंतर रुग्णालय मृतदेह ताब्यात देत नाहीत आणि सुमारे दीड लाख रुपये देण्याची मागणी करीत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.