Amravati Violence: त्रिपुरा येथे घडलेल्या हिंसाचारामुळे आता महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. त्यानुसार राज्यातील विविध ठिकाणी मोर्चे काढले गेले. पण त्याला आक्रमक वळण लागल्याचे दिसून आले. अशातच आज अमरावतीत सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले आहे. जमावाकडून दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. या जमावाला मागे हटवण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला गेला.
भाजप कडून आज अमरावतीत बंदची हाक दिली गेली होती. कारण काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गेला. परंतु त्यावेळी मोर्चाला हिंसक वळण लागले गेले. त्याचा निषेध म्हणूनच आज बंदची हाक दिल्यानंतर आता तेथील परिस्थिती तापल्याचे दिसून येत आहे.(Malegaon Violence: नांदेड आणि मालेगावमध्ये बंद दरम्यान चकमक, हिंसाचारात 7 पोलीस कर्मचारी जखमी)
Tweet:
A furious mob of jihadis torched two districts including Amravati in Maharashtra. The jihadis pelted stones at the shops of Hindu traders as part of a well-planned conspiracy, in which many people including the police were injured.#Amravati #TripuraRiots pic.twitter.com/uowvE71Q7U
— SAGAR (kika) 🇮🇳 (@iam_ocean6) November 13, 2021
दरम्यान, त्रिपुरा येथील घटनेचा विरोध करण्यासाठी आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार नांदेड मध्ये मुस्लिम संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन आणि घोषणाबाजी केली. परंतु त्याला काही वेळाने हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. दुकाने सुद्धा जबरदस्तीने बंद केली गेली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि पोलिसांसोबत वाद झाले.
तर बांग्लादेशात हिंदूवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर त्रिपुरात परिस्थिती चिघळली गेली. मुस्लिम संघटनानी आरोप केला होता की, त्यांना धमकी देण्यासह त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये असे ही कळले की, मुस्जिदींचे नुकसान आणि तोडफोड केली गेली. परंतु पोलिसांनी आपल्या तपासात ही बातमी नाकारली. मात्र तेथीत तणापूर्ण स्थिती आणि सोशल मीडियातील काही पोस्टमुळे संपूर्ण देशात त्रिपुरात हिंसाचाराचा विरोध केला गेला.