महाराष्ट्र

Sanjay Raut On Ram Janmabhoomi Temple Inauguration: भाजप प्रभू राम यांना निवडणूक उमेदवार म्हणून घोषित करेल; अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनापूर्वी संजय राऊत यांचे केंद्रावर टीकास्त्र

Bhakti Aghav

पुढील काही दिवसात भाजप निवडणुकीसाठी प्रभू रामच त्यांचा उमेदवार असेल अशी घोषणा करेल. प्रभू रामाच्या नावावर इतकं राजकारण केलं जात आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. यावेळी प्रभू रामाच्या नावाच्या कथित राजकीयीकरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

Viksit Bharat Sankalp Yatra: भारत संकल्प यात्रेआडून मोदींचा प्रचार? सरकारी अधिकाऱ्यांकडून कामकाजालाच नकार, जिल्हाधिकाऱ्यांना धाडले पत्र

टीम लेटेस्टली

केंद्र सरकारने (Central Government) घेतलेले निर्णय, योजना आदींची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा (Viksit Bharat Sankalp Yatra) सुरु करण्यात आली आहे. ही यात्रा सरकारी अधिकारी गावखेड्यांपर्यंत घेऊन जात आहेत.

Mumbai Traffic Police Advisory: नववर्षाचा जल्लोष, मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियम आणि प्रतिबंध लागू; घ्या जाणून

टीम लेटेस्टली

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियम आणि प्रतिबंध लागू केले आहेत. मुंबई पोलिसांनी जारी केलेली ट्रॅफिक अॅडव्हायझरी ही 31 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत लागू असेल.

Zomato Delivery Boy Dies After Speeding BEST Bus Hits: बेस्ट बसची दुचाकीला धडक; 22 वर्षीय झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, चालकाला अटक

Bhakti Aghav

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस कुर्ल्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून दुचाकीला धडक दिली. ऑर्डर देण्यासाठी निघालेला सौरभ रस्त्यावर पडला आणि बेस्ट बसच्या चाकाखाली आला. ही घटना मरोळ मेट्रो स्टेशनजवळ घडली.

Advertisement

Accident On Panvel Highway: पनवेल महामार्गावर भरधाव कारची अवजड वाहनाला धडक; 1 ठार, 2 जखमी

Bhakti Aghav

अपघातादरम्यान, तेजस पालांडे कार चालवत होता. तर विकेश तांबे त्यांच्या शेजारी बसला होता. तसेच सुजित खोसे हा मागच्या सीटवर बसला होता. पुढे बसलेल्या तांबे याचा अपघातात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तथापी, स्थानिकांनी तात्काळ अपघाताची माहिती पोलिसांना सांगितली.

Newly Married Woman Died At Prabalgad Fort: सेल्फीचा मोह पडला महागात! प्रबळगड किल्यावरून कोसळून पुण्यातील नवविवाहितेचा मृत्यू

Bhakti Aghav

नवविवाहित दाम्पत्य बुधवारी हनिमूनसाठी लोणावळ्याहून निघाले आणि गुरुवारी सकाळी ते माची प्रबळगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले. दुपारी 2.30 च्या सुमारास, गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर शुभांगीने घाटाच्या काठावर उभी राहून सेल्फी काढण्यास सुरुवात केली. सेल्फी काढण्याच्या नादात शुभांगीचा तोल गेला आणि ती खोल दरीत पडली.

Kolhapur Crime: कोल्हापूरात शाररिक संबंधास नकार दिल्याने संतापून विधवा महिलेचा खून, मृतदेह ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, आरोपीला अटक

Pooja Chavan

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील आजरा येथे एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Rashmi Shukla New DGP of Maharashtra: रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Bhakti Aghav

यापूर्वी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर विभागाचे संचालक म्हणून पदभार सांभाळला आहे.

Advertisement

Bus Overturned Tamhani Ghat: रायगडमधील ताम्हणी घाटात बस उलटून दोन ठार, 55 जखमी

टीम लेटेस्टली

रायगड जिल्ह्यातील ताम्हणी घाटात बस उलटून शनिवारी (30 डिसेंबर) अपघात घडला. या अपघातात दोघे जण ठार तर 55 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

COVID-19 Cases In Maharashtra: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात 129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; JN.1 प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 10 वर

Bhakti Aghav

1 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रात 137 कोविड-19 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 70.80 टक्के मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये झाले आहेत, 84 टक्के मृत व्यक्तींना कॉमोरबिडीटीज होते, तर 16 टक्के लोकांमध्ये कोणतेही आजार नव्हते.

Mumbai: बृहन्मुंबई हद्दीत 5 जानेवारीपर्यंत जमावबंदी; पॅराग्लाइडर्स, मायक्रोलाइट एअर क्राफ्ट, ड्रोनच्या वापरावर बंदी

टीम लेटेस्टली

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बॅण्ड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Liquor Shops in Mumbai: मद्यप्रेमींसाठी दिलासा! मुंबईत 31 डिसेंबर रोजी रात्री 1 पर्यंत चालू राहणार दारूची दुकाने

टीम लेटेस्टली

मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता 31 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत असणार आहे.

Advertisement

Mumbai New Year Celebration: मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनाती, कडक सुरक्षा उपाय; नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत प्रशासनाची मोठी तयारी, उपद्रव करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

टीम लेटेस्टली

मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदीही केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्त घालतील आणि सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी चौक्या उभारतील. मुंबई पोलीस 2023 च्या शेवटच्या दिवशी विशेष मोहीम राबवणार आहेत, ज्यात हिट-अँड-ड्राइव्हच्या घटना रोखणे आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

Mahalaxmi Saras Exhibition: फूड कोर्टवर खवय्यांनी गर्दी, अनेक सांस्कृतिक-मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन; जाणून घ्या मुंबईमधील लोकप्रिय 'महालक्ष्मी सरस प्रदर्शना'चे स्वरूप

टीम लेटेस्टली

सरस प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे.

Ayodhya Ram Temple: राम मंदिर उद्घाटनानंतर महाराष्ट्रातून धावणार ‘अयोध्या स्पेशल’ ट्रेन; Shivsena UBT म्हणतात, 'देशातील लोकांचे वास्तविक समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा मार्ग'

टीम लेटेस्टली

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन आणि उत्सवात सहभागी होण्यासाठी पक्षाने मुंबईतील प्रमुख मंदिरांमध्ये विशेष तरतूद केल्याचे भाजपने म्हटले आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या 'दीपोत्सवा'साठी मुंबईतील प्रत्येक प्रभागातील सुमारे 10,000 घरांमध्ये दिवे लावले जातील, असे शेलार म्हणाले.

Mumbai Dust Pollution: धुळीच्या प्रदूषणाला तोंड देण्यासाठी BMC दररोज धुणार 1,000 किमी रस्ते; इक्बाल सिंग चहल यांचे निर्देश

टीम लेटेस्टली

बीएमसीने 31 डिसेंबर रोजी ‘मेगा डीप क्लीनिंग’ मोहीम देखील जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर बीएमसीने वाढते वायू प्रदूषण रोखण्यासाठी 3 नोव्हेंबरपासून रस्ते धुण्यास सुरुवात केली.

Advertisement

Bengaluru Shocker: बेंगलूरू मध्ये रहिवासी अपार्टमेंटच्या पूलमध्ये 9 वर्षीय मुलगी आढळली मृतावस्थेमध्ये!

Dipali Nevarekar

मुलीला नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

Katraj Tunnel Road Accident: सातारा कडून मुंबई कडे येणार्‍या मार्गिकेवर 5 वाहनं एकमेकांवर आदळली; 1 महिला जखमी

टीम लेटेस्टली

कात्रजच्या बोगद्यामध्ये वेगावर मर्यादा असूनही वाहनं ती पाळत नसल्याचं समोर आलं आहे. वेगात वाहनं आदळल्याने मोठं नुकसान झाले आहे.

Nagpur Accident: धक्कादायक, बिडगावात टिप्परची सायकलला धडक, दोघांचा मृत्यू, संतप्त जमावाकडून ट्रकची जाळपोळ

Pooja Chavan

नागपूर शहरातील वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिडगाव चौकात मोठा एक अपघात झाला आहे.

Pune Crime: येरवडा जेलमध्ये पूर्व वैमानस्यातून कैद्याची निर्घृण हत्या, पुण्यात खळबळ

Pooja Chavan

पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी चार कैद्यांविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Advertisement