Leopard Skin & Nails Dumped In Lake: आरे जंगलातील तलावात आढळली बिबट्याची कातडी आणि नखे; चौकशी सुरू

तपासाचा एक भाग म्हणून वन विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे येथील बिबट्यांचा सध्याचा डेटाबेस तपासत आहेत.

Leopard प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Wikimedia commons)

Leopard Skin & Nails Dumped In Lake: आरे जंगलातील (Aarey Forest) तलावात (Lake) बिबट्याची कातडी (Leopard Skin) आणि नखांचे तुकडे फेकलेले आढळले. एका कामगाराला शनिवारी सकाळी जंगलाच्या मरोळ बाजूला असलेल्या तलावात कापडात गुंडाळलेले बिबट्याचे कातडे आणि नखे सापडले. त्याने यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती दिली.

रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW) चे संस्थापक आणि अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले की, मुंबई परिक्षेत्रातील वन अधिकारी आवश्यक कारवाई सुरू करतील. कारण, हे शिकारी किंवा अवैध वन्यजीव व्यापाराचे प्रकरण आहे. (हेही वाचा -Leopard Attacks Dog In Pune: बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, घरातल्यांची धावपळ; पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video))

तपासाचा एक भाग म्हणून वन विभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे येथील बिबट्यांचा सध्याचा डेटाबेस तपासत आहेत. मुंबईत बिबट्या ही सामान्य शिकारी प्रजाती आहे. बिबट्या मुंबईत आढळणाऱ्या प्रमुख शिकारी प्रजातींपैकी एक आहेत. तथापी, ते वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची 1 अंतर्गत सूचीबद्ध आहेत. ज्यामुळे त्यांना सर्वोच्च पातळीचे संरक्षण मिळते. (वाचा - Female Leopard And Two Cubs Electrocuted: रानडुकरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या विद्यूत तारांच्या संपर्कात आल्याने मादी बिबट्या आणि 2 शावकांचा मृत्यू; चौघांना अटक)

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका टेलिव्हिजन सेटवर बिबट्याने प्रवेश केल्याची घटना घडली होती. चित्रपटाच्या सेटवर बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एसजीएनपी आणि आरे कॉलनीच्या परिघावर असलेल्या मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक गृहसंकुलांमध्ये यापूर्वी बिबट्याचे दर्शन घडले आहे.