Mumbai News: श्रीलंकेतून आलेल्या व्यक्तीकडून सीमा शुल्क विभागाने 1.65 कोटी किमतीचे सोने केले जप्त
मुंबईतील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी श्रीलंकेतून भारतात 1.65 कोटी किमतीचे 2,935 ग्रॅम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.
Mumbai News: मुंबईतील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी श्रीलंकेतून भारतात 1.65 कोटी किमतीचे 2,935 ग्रॅम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर आरोपीला अडवण्याच आले आणि त्याने कोणतीही अवैद्य साहित्य नेण्यास नकार दिला. चौकशीतून समोर आले की, फ्लाइटमधून एका अज्ञात व्यक्तीकडे सोने आहे. (हेही वाचा- तनिष्क ज्वेलर्सने लाँच केले 'गोल्ड कॉईन एटीएम'; एटीएममधून नोटा नाही)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने एका 28 वर्षीय व्यक्तीला सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक केले.एअर इंटेलिजेंस युनिटने त्याच्याकडून ₹ 1.65 कोटी किमतीचे 2,935 ग्रॅम 24 KT सोने जप्त केले. कमल उद्दीन असे आरोपीचे नाव आहे. तो शनिवारी श्रीलंकन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक UL-143 ने कोलंबो (श्रीलंका) येथून आला होता. ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर त्याला अडवण्यात आले.
एअर इंटेलिजेंस युनिटने कडक नजर ठेवली होती.आरोपीला सामानांसाठी विचारणा करण्यात आली तेव्हा तो वैयक्तिकरित्या कोणतीही कर्तव्ययोग्य वस्तू, प्रतिबंधित वस्तू किंवा सोने घेऊन जात आहे का, तेव्हा त्याने कोणतीही बेकायदेशीर सामग्री वाहून नेल्याचा आरोप नाकारला होता. तपासणीत त्याला एक पिशवी घेऊन जात असल्याचे दिसले. त्यात त्यांना 2,935 ग्रॅम वजनाच्या सहा पाऊचमध्ये 24 कॅरेट सोने सापडले, ज्याची किंमत भारतीय बाजारपेठेत 1,65 कोटी रुपये आहे . हे सोने कस्टम कायद्यान्वये जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपी हे सोने भारतात गुपचूप तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निष्पन्न झाले.