Mumbai Police: हत्येच्या गुन्ह्यात फरार, आरोपीला 31 वर्षांनंतर नालासोपारा येथून अटक

तब्बल 31 वर्षे तो फरार होता.

Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 1989 च्या एका खुनाच्या गुन्ह्यात वॉन्टेड असलेल्या 62 वर्षीय दीपक भिसे या व्यक्तीला अटक (Maharashtra Man Wanted in Murder Case Arrested) केली आहे. तब्बल 31 वर्षे तो फरार होता. महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यातील नालासोपारा (Nala Sopara) येथे करण्यात आलेली ही अटक अधिकाऱ्यांनी तीन दशकांनंतर राबविलेल्या तपास मोहीम आणि गुन्ह्याची उकल करण्याचा एक भाग आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार भिसे याच्यावर राजू चिकना याची हत्या आणि धर्मेंद्र सरोज यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीडितांना न्याय मिळावा यासाठी दीर्घकाळापासून पोलीस पाठपुरावा करत होते. ते आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर केलेल्या तपासात शुक्रवारी (29 डिसेंबर) रात्री ही अटक करण्यात आली.

तब्बल 30 वर्षे शोध सुरु

दीपक भिसे याला या गुन्ह्यात अटक झाली होती. मात्र, त्याला 1992 मध्ये जामीन मिळाला होता. तेव्हापासून तो न्यायालयीन सुनावणीस हजर राहू शकला नाही. त्यामुळे 2003 मध्ये न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. पोलीस तपासादरम्यान स्थानिकांनी पोलिसांना तो मरण पावला असावा असा अंदाजही व्यक्त केला होता. मात्र, तरीही पोलिसांकडून त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरुच होते. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचा मोबाईल नंबर शोधून काढला. त्यावर संपर्क केल्यावर पोलिसांना आरोपीचा दूम लागला. शेवटी त्याला नालासोपारा येथून अटक झाली. आरोपी नालासोपारा येथे त्याच्या कुटुंबासह स्थायिक झाला होता. (हेही वाचा, Nagpur Crime News: भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, नागपूर येथील घटना)

आरोपीची पार्श्वभूमी:

दीपक भिसे (वय 62) हा तुळसकरवाडी, उपनगरीय कांदिवली येथे राहत होता. तो वृक्षतोडीच्या बेकायदेशीर कामा गुंतला होता. महत्त्वाचे म्हणजे हत्येचा आरोप असताना आणि पोलीस मागावर असतानाही तो सामान्य नागरिकाप्रमाणे वावरत होता. त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. असे असले तरी तो पोलिसांच्या रडारवर होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच. (हेही वाचा, Delhi Crime: दिल्लीत मैत्रिणीशी बोलण्यावरून वाद, तरुणाची चाकून भोसकून हत्या, तिघांना अटक)

मुंबई पोलिसांनी पुष्टी करताना म्हटले की, पुढील तपास सुरू आहे.आरोपी प्रदीर्घ काळ फरार असला तरी तो पोलिसांपासून वाचू शकत नाही. कालावधी लोटला म्हणून गुन्ह्याची तीव्रताही कमी होत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच पोलिसांची कामगिरी यावर टाकलेला प्रकाश म्हणजेच ही अटक आहे. आरोपीने कितीही हुशारी केली आणि तो कितीही दूर पळण्याचा प्रयत्न करत असेल तरीही तो पोलिसांसून दूर जाऊ शकत नाही. फक्त तो जीवंत असायला पाहिजे.