Rohini Khadse on Sheetal Mhatre: 'चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राला माहीत आहेत', रोहिणी खडसे यांची शितल म्हात्रे यांच्यावर तीव्र टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या नेत्या शितल म्हात्रे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या नेत्या शितल म्हात्रे यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडिया मंच 'X' (पूर्वीचे ट्वीटर) च्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत हे टीकास्त्र सोडण्यामध्ये आले आहे. ज्यामध्ये 'चिखल उडवताना याद राखा. चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकी नुसार वागा!', अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे.
''शितल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारली''
रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विट पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. मात्र गेले काही दिवस झाले शितल म्हात्रे यांनी गायपट्ट्याची संस्कृती अंगिकारल्याची झलकच दाखवून दिली आहे. आदरणीय सुप्रिया ताई बद्दल बोलताना त्यांना महिला दिसत नाही परंतु स्वतःवर आले की त्यांना महिला सबलीकरण आठवते. शितल म्हात्रे तुमची लायकी नाही हो सुप्रिया ताई सुळे यांच्या वर टिका करायची. तुम्ही स्वकर्तुत्वाने आमदार होऊन दाखवा आधी. त्यांना संसदरत्न, संसद महारत्न असे पुरस्कार त्यांनी केलेल्या कामामुळे मिळाले आहेत. राहिला प्रश्न वांग्याचा तर स्वतःच्या मध्ये हिंमत असेल तर कोर्टात जा , RTI टाका माहिती घ्या नंतर आपले पिसाळे तोंड उघडा.'' (हेही वाचा, शीतल म्हात्रे, आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल)
'शिंदळ बाई ने सावित्री वर चिखल उडवण्या सारखे'
आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये खडसे यांनी पुढे म्हटले आहे की,''चौकशी लागेल म्हणून स्वपक्षासोबत गद्दारी केलेल्या म्हात्रे बाई ने सुप्रिया ताई सुळे यांच्या वर बोलणे म्हणजे शिंदळ बाई ने सावित्री वर चिखल उडवण्या सारखे आहे. शीतल म्हात्रे आपलं चिचुंद्री सारखे तोंड बंद ठेव. आदरणीय सुप्रिया ताई वर टिका करताना भाषेचे भान असू द्या, नाहीतर त्याच भाषेत उत्तर दिले जाईल..! चुम्मा चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण आहे हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे आपल्या लायकी नुसार वागा!'' (हेही वाचा, Rohini Khadse खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी, Sharad Pawar यांचा निर्णय)
'वांगी सम्राज्ञी पूरस्कार'
देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश झाला आहे इंडिया टुडेने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. त्यावरुन खोचक टीका करत 10 एकरात 110 कोटींची वांगी.. हा तर चक्क कृषीक्षेत्रातला वैज्ञानिक शोध.. वांगी सम्राज्ञी नामक एक पुरस्कार पण सुसुताईंना लवकरच दिला पाहिजे, अशी टीका शितल म्हात्रे यांनी एक्स पोस्टवरुन केली होती. यावरुनच रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.