Maharashtra New DGP: पोलीस महासंचालक रजनीश शेठ निवृत्त, विवेक फणसाळकरांकडे अतिरिक्त कार्यभार

पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे.

एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.  रजनीश सेठ हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांचा 29 डिसेंबर 1963 रोजी जन्म झाला. ते 25 ऑगस्ट 1988 ला पोलीस दलात भरती झाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे. (हेही वाचा - Rashmi Shukla New DGP of Maharashtra: रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती)

यातच गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होतील, अशी चर्चा होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचंही बोललं जात होतं.  रजनीश सेठ यांचं शिक्षण हे बीए ऑनर्स (एलएलबी) झालं. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख देखील राहिलेले आहेत.