महाराष्ट्र
Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंच्या विरुद्ध संदीपान भुमरेंना शिंदे गटाने दिली उमेदवारी
Amol Moreशिवसेना शिंदे गटाने आजच परिपत्रक काढून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
Maharashtra Rain Alert: पश्चिम महाराष्ट्र, कोकणात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, पुढचे काही तास महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा
Amol Moreमहाराष्ट्रासह देशात सध्या उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस आणि गारपीट, वादळाच्या ही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.
Group-C Services Combined Examination-2023: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेतुल उमेदवार गुणवत्तेवरच पात्र- एमपीएससी
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारा नुकतीच गट-क सेवा संयुक्त परीक्षा (2023) घेण्यात आली. या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेच्या आवेदनपत्रात 'कर सहायक' संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.
Ajit Pawar NCP: अजित पवार यांच्याबद्दलच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजी? पक्षात चलबिचल
अण्णासाहेब चवरेअजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षातही सर्वच काही अलबेल नाही. दस्तुरखुद्द अजित पवार यांच्याबद्दलच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा (Lok Sabha Constituency) मतदारसंघावरील हक्क सोडल्यावरुन ही नारजी असल्याचे समजते.
Mumbai Police Receives Hoax Call: मुंबई पोलिसांना फसवा कॉल; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य शहरात हल्ला करणार असल्याचा केला दावा, चौकशी सुरू
टीम लेटेस्टलीकॉलरने बिश्नोईचा सहकारी दादर रेल्वे स्थानकावर येणार असल्याचेही नमूद केले. ही बातमी समजताच संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली. मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि इतर सर्व यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
Sunil Chavan Set To Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार! माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचा मुलगा सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार
Bhakti Aghavमधुकरराव चव्हाण यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्या मुलाचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
State Government: शासनाकडून शाळांना निर्देश, उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांना गैरहजर राहण्यास सवलत
Pooja Chavanराज्य सरकारने सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसाठी निर्देष जारी केले आहेत. उष्णतेमुळे अनेक समस्या वाढू लागल्यामुळे खास विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतले आहे. विद्यार्थ्यांचा शाळा दुपारच्या सत्रात असतात.
Nagpur: मतदान केंद्रावर नितीन गडकरी यांचे नाव, फोटो आणि भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेली मतदार स्लीपची छापाई; व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
टीम लेटेस्टलीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव, फोटो आणि भाजपचे ‘कमळ’ चिन्ह असलेली मतदार स्लिप नागपूर येथील मतदान केंद्राजवळ छापण्यात आल्याचा आरोप नेटिझन्सनी केला आहे. ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Aaditya Thackeray यांना CM पदासाठी तयार करुन देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते, उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट
अण्णासाहेब चवरेशिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मग मी दिल्लीच्या राजकारणात जातो, असा शब्द स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला होता.
Woman Molesting Shopping Centre Washroom: खरेदी केंद्राच्या शौचालयात महिलेचा विनयंभंग, हत्येचा प्रयत्न; मुंबई पोलिसांकडून सुरक्षा रक्षकास अटक
अण्णासाहेब चवरेमुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रमाशंकर गौतम उर्फ संदीप पांडे नावाच्या 21 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या शौचालयात महिलेचा विनयभंग (Man Molesting Woman) आणि तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
Navi Mumbai: पाम बीच रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू; पक्षीप्रेमींकडून चिंता व्यक्त (Watch Video)
टीम लेटेस्टली22 वर्षीय सिनेमॅटोग्राफर आणि पक्षी प्रेमी हमराज खुराना याने सर्वात प्रथम फ्लेमिंगोला रस्त्यावर पाहिले. खुराना यांनी सांगितलं की, आम्ही एनआरआय सिग्नलवर पाम बीचच्या सर्व्हिस रोडवर एक पक्षी लोळताना आणि उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रयत्नांनंतरही पक्षी खाली कोसळला आणि मरण पावला.
Gold Seized at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर 5.71 कोटी रुपयांचे 9.4 किलोपेक्षा जास्त सोने जप्त; 8 जणांना अटक
टीम लेटेस्टलीसीमाशुल्क विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 14 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 5.71 कोटी रुपयांचे 9.482 किलोग्राम सोने जप्त केले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. सोमवार ते गुरुवार दरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आठ प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
Buldhana Police: शस्त्रांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई
Pooja Chavanबुलढाणा आणि मध्यप्रदेशातील राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी ४ पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
Mumbai Water Cut: मुंबईत या भागात या दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचे आवाहन
Amol Moreबृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पी दक्षिण विभागातील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील जलवाहिनी बदलण्यात येणार आहे.
Sharad Pawar jibe Amit Shah: शरद पवार यांच्या गुगलीने अमित शाह बोल्ड; सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा नारळ वाढवला
अण्णासाहेब चवरे1967 पासून मी राजकारणात आहे. त्यामुळे त्यापैकी नेमक्या कोणत्या 10 वर्षांचा तुम्हाला हिशोब हवा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या प्रचाराचा नारळ वाढवताना ते बोलत होते.
Fire Breakout Phoenix Mall Pune: पुणे यथील विमान नगर परिसरात फिनिक्स मॉलला आग, परिसरात धुराचे लोट (Watch Video)
टीम लेटेस्टलीपुणे यथील विमान नगर परिसरात असलेल्या फिनिक्स मॉलमध्ये मोठी आग भडकली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. आग मोठ्या प्रमाणवर असलल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागली असताना काही कर्मचारी मॉलमध्येच अडकल्याचे समजते.
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांची माघार, महायुतीसमोर पेच; नाशिकच्या जागेवरुन संभ्रम कायम
अण्णासाहेब चवरेनाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन सत्ताधारी पक्षांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर आपण नाशिक मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेत आहोत, असे छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याउलट विरोधी पक्षांत असलेल्या महाविकासआघाडीने त्यांचा उमेदवार जाहीर केला आणि ते कामलाही लागले, असेह ते म्हणाले.
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, आडोशी बोगद्याजवळ वाहन कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
टीम लेटेस्टलीरात्री उशिरा झालेल्या या अपघातामुळे सकाळच्या वेळेतही वर्दळीच्या महामार्गावर अनेक तास वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणारे वाहनधारक पहाटेच्या सुमारास लांबच लांब ट्रॅफिक लेनमध्ये अडकले होते.
Mumbai Local Power Block: मुंबई मध्ये 19-21 एप्रिल दरम्यान मध्य रेल्वे कडून पॉवर ब्लॉक; हार्बर आणि मेन लाईन वर होणार 'हे' बदल
टीम लेटेस्टलीमध्य रेल्वे वर रात्री 12.14 ची सीएसएमटी ते कसारा ही शेवटची लोकल असणार आहे. कर्जत, ठाणे ट्रेन रद्द करण्यात आली आहे. यामुळे कर्जत, खोपोली मध्ये जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
Sangli and Madha Lok Sabha constituencies: शरद पवार यांचा डाव, माढ्याचा तिढा सुटला, सांगलीतही मनोमिलन; महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा
अण्णासाहेब चवरेशिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्ही पक्ष फोडल्यानंतरही भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या या प्रयत्नांना ठाकरे आणि पवार हे तोडीस तोड खेळी करत आहेत.