Sunil Chavan Set To Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार! माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचा मुलगा सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

मधुकरराव चव्हाण यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्या मुलाचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

Sunil Chavan (PC - X)

Sunil Chavan Set To Join BJP: देशभरात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Shabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडले. अशातचं आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. माजी मंत्री आणि तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण (Madhukarrao Chavan) यांचे पुत्र धाराशिव नेते सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरचं ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, मधुकरराव हे जुन्या पक्षात राहतील अशी अपेक्षा आहे. परंतु त्यांनी अद्याप काँग्रेसच्या प्रचारात भाग घेतलेला नाही.

मधुकरराव चव्हाण यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांच्या मुलाचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे मानले जात आहे. तेव्हापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुनील कमळ हातात घेणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement