Navi Mumbai: पाम बीच रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू; पक्षीप्रेमींकडून चिंता व्यक्त (Watch Video)
खुराना यांनी सांगितलं की, आम्ही एनआरआय सिग्नलवर पाम बीचच्या सर्व्हिस रोडवर एक पक्षी लोळताना आणि उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रयत्नांनंतरही पक्षी खाली कोसळला आणि मरण पावला.
Navi Mumbai: नवी मुंबईत पहिल्यांदाच फ्लेमिंगो (Flamingos) रस्त्यावरून फिरताना दिसले. दुर्दैवाने, यातील अनेक सुंदर पक्षी शुक्रवारी पहाटे पाम बीच रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर वाहनांच्या धडकेने मरण पावले. 22 वर्षीय सिनेमॅटोग्राफर आणि पक्षी प्रेमी हमराज खुराना याने सर्वात प्रथम फ्लेमिंगोला रस्त्यावर पाहिले. खुराना यांनी सांगितलं की, आम्ही एनआरआय सिग्नलवर पाम बीचच्या सर्व्हिस रोडवर एक पक्षी लोळताना आणि उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिले आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रयत्नांनंतरही पक्षी खाली कोसळला आणि मरण पावला. खुराणा यांनी एनआरआय पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी पक्ष्याला बाजूला केले कारण त्या वेळी कोणतीही मदत पोहोचू शकली नाही. पहाटे 1.45 च्या सुमारास घडलेली ही घटना हिट अँड रनची घटना मानली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने घटनेचे रेकॉर्डिंग केले असावे, असे खुराणा यांचे मत आहे. नंतर खुराणा यांना पाम बीच रस्त्यावर आणखी एक फ्लेमिंगो फिरताना दिसला. सुमारे चार फ्लेमिंगो रस्त्यावर चालत होते आणि ते चांगल्या स्थितीत दिसत नव्हते. त्यापैकी एक माझ्यासमोर मरण पावला, असंही त्यांनी सांगितलं. माजी नगरसेवक भरत जाधव यांनीही सीवूड्स एनआरआय परिसरात दोन मृत फ्लेमिंगो दाखविणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)