Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, आडोशी बोगद्याजवळ वाहन कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबईहून पुण्याकडे जाणारे वाहनधारक पहाटेच्या सुमारास लांबच लांब ट्रॅफिक लेनमध्ये अडकले होते.

Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामुळे (Accident) अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली. आडोशी बोगद्या (Adoshi Tunnel) जवळ झालेल्या अपघातात एकाच वाहनाचा समावेश होता, अशी पुष्टी महामार्ग वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.

रात्री उशिरा झालेल्या या अपघातामुळे सकाळच्या वेळेतही वर्दळीच्या महामार्गावर अनेक तास वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणारे वाहनधारक पहाटेच्या सुमारास लांबच लांब ट्रॅफिक लेनमध्ये अडकले होते. महामार्ग वाहतूक पोलीस आणि इतर अधिकारी अपघातामुळे बाधित झालेला रस्ता मोकळा करणे, वाहनांचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी येणारी वाहतूक व्यवस्थापित करणे इत्यादी कार्यात व्यस्त होते. (हेही वाचा - Mumbai Local Power Block: मुंबई मध्ये 19-21 एप्रिल दरम्यान मध्य रेल्वे कडून पॉवर ब्लॉक; हार्बर आणि मेन लाईन वर होणार 'हे' बदल)

तथापी, पुण्याकडे जाताना अनेक तास रहदारीत अडकलेल्या वाहनांना रस्ता मिळावा यासाठी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर ब्लॉक लावण्यात आला होता. महामार्ग वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी देखील पुष्टी केली की, काही तासांत ब्लॉक हटविला जाईल कारण या भागातील वाहतूक स्थिती सामान्य होईल. (हेही वाचा -Sangli Accident: वऱ्हाड घेवून निघालेल्या गाडीचा सांगलीत भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू)

दरम्यान, मालवाहू ट्रक आणि ट्रेलरसह अवजड वाहने सहसा पहाटेच्या वेळेत शहरांतून प्रवास करतात. ज्यामुळे सकाळच्या वेळेस वाहतुकीची समस्या निर्माण होते. अशा वेळी होणारे अपघात वाहनचालकांना अधिक अडचणी निर्माण करतात.