Buldhana Police: शस्त्रांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

या कारवाईतून पोलिसांनी ४ पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

Police Representative Image (Photo Credits: Instagram)

Buldhana Police: बुलढाणा आणि मध्यप्रदेशातील राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी 4 पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या कारवाईतून चौघांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी सीमावर्ती भागात छापा टाकला होता. चौघांवर शस्त्र कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.ठिकठिकाणी मतदान सुरु आहे. त्यात तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी कारवाई सुरु केली. (हेही वाचा- मुंबई विमानतळावर 5.71 कोटी रुपयांचे 9.4 किलोपेक्षा जास्त सोने जप्त; 8 जणांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाळा पोलिसांनी वसाडी ते हाडियामल दरम्यान कारवाई केली. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला होता. चौघे जण पिस्तूलचा सौदा करण्याच्या बेतात होते तेवढ्यात पोलिसांनी चौघांना पकडले. त्यानंतर चौघांची अंगझडती घेतली होती. त्याच्याकडून 4 पिस्तूल, मॅगझीन सह 17 जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, मोबाईल आणि 2 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी चौघांची कसुन चौकशी केली. ते मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याचे समोर आले. आरोपी पिस्तुलची तस्करी करण्याच्या बेतात होते. भारसिंग, मिसऱ्या खिराडेव, हिरचंद गुमानदेव उचवार (दोन्ही रहिवासी पाचोरी तहसिल खकणार जिल्हा बऱ्हाणपूर), आकाश मुरलीधर मेश्राम (करूनासागर बालाघाट) संदीप डोंगरे (आमगाव बालाघाट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिस्तुल तस्करीअंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.