Aaditya Thackeray यांना CM पदासाठी तयार करुन देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते, उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मग मी दिल्लीच्या राजकारणात जातो, असा शब्द स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला होता.

Uddhav Thackeray | (Photo Credit - Facebook)

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मग मी दिल्लीच्या राजकारणात जातो, असा शब्द स्वत: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला होता. भाजपसोबत आमचे छान चालले होते. तुम्ही (भाजप) देश सांभाळतो आम्ही (शिवसेना) महाराष्ट्र सांभाळतो, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाच दोन्ही पक्षांमध्ये ठरले होते. त्यानुसार सर्व ठिक सुरु होते. मात्र, अमित शाह भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून या सूरच बदल झाला, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

'भाजपबद्दल संतापाची लाट'

भाजपने आपला शब्द फिरवला आणि आपल्यास लोकांसमोर मला खोटं ठरविण्याचा प्रयत्न केला, असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हाच्या बैठकीत सत्तेचे समान वाटप आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद हे ठरलं होतं. शहांनीही शब्द फिरवला, असे ते म्हणाले. देशातील चित्र पूर्णपणे बदलले असून लोकांना भाजपबद्दल संतापाची लाट निर्माण झाली आहे. लोकांना परिवर्तन हवे असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Shiv Sena (UBT) Campaign Song: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत प्रचार गीत प्रदर्शित (Watch Video))

'भाजपची भाषा मग्रूरीची'

सत्तेत आला तेव्हा भाजपची भाषा मग्रूरीची राहिली. भाजपला विरोधातील आवाज चालत नाही. त्यामुळे सुरुवातील सर्वजण भाजपला घाबरुन असायचे. पण आता त्यांना कोणी घाबरत नाही. 2023 पर्यंत लोकांनी सहन केले. पण आता लोक बोलत आहेत. आता भाजपविरोधात बोलण्यासाठी मी आणि राहुल गांधी पुढे आलो आहोत. त्यामुळे लोकांनाही वाटते आहे की, भाजपच्या विरोधात बोलणारे कोणीतरी आहे. खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपविरोधात जनमत तयार झाल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Sangli and Madha Lok Sabha constituencies: शरद पवार यांचा डाव, माढ्याचा तिढा सुटला, सांगलीतही मनोमिलन; महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा)

भाजपने पाठिमागच्या 10 वर्षांमध्ये काहीही काम केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखेही काही नाही. त्यामुळे ते केवळ प्रभू रामचंद्राच्या नावावर मतं मागत आहेत. नुकताच मी युट्युबवर एक व्हिडओ पाहिला. ज्यामध्ये एका शेतकऱ्याला विचारण्यात येत आहे की, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळाले का? यावर शेतकरी म्हणतो होय, मला 2000 हजार रुपये मिळाले. पण, शेतीसाठी मी वर्षाला 1 लाख रुपयांची खतं घातली आहेत. त्यावर 18% जीएसटीही भरला आहे. त्यामुळे केंद्राकडून माझ्या खात्यावर माझ्याकडे 12,000 रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे भाजपचा फोलपणा सर्वांनाच कळला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif