महाराष्ट्र

Mumbai Shocker: TISS मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू, भाड्याच्या खोलीत सापडला मृतदेह, पोलिसांनी व्यक्त केला रॅगिंगचा संशय

Shreya Varke

मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) चा एक विद्यार्थी रविवारी सकाळी वाशी येथे मित्रांसोबत पार्टीत गेल्यानंतर त्याच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याचा मृत्यू रॅगिंगमुळे झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Mumbai Rape Case: मुंबईकर महिलेला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार; मुंबई पोलिसांनी आरोपीच्या लुधियाना मधून आवळल्या मुसक्या

Dipali Nevarekar

बलात्कारासोबतच पीडीतेने आरोपीकडून हुंडा मागितला असल्याची देखील तक्रार दिली आहे.

Congress MP Vasant Chavan Dies: काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jyoti Kadam

नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खासदार खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. हैदराबादमधील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Pune Police Attack: कुख्यात गुंड्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस निरिक्षकांवर कोयत्याने हल्ला, आरोपी फरार

Pooja Chavan

पुण्यातील कोथरूडमध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोथरूडच्या एका पोलिस निरिक्षकावर दोन हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. या घटनेत पोलिस गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावरील हल्लामागे कुख्यात कोयता टोळीचा हात असल्याचा संशय आहे.

Advertisement

Maharashtra Rain Update: मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाहा कसे असेल उद्याचे हवामान

Amol More

उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे. नाशिकमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Western Railway Block: पश्चिम रेल्वेवर 35 दिवसांचा ब्लॉक, 960 लोकल फेऱ्यांवर परिणाम

Amol More

मुंबईत पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी 31 ऑगस्टपासून 35 दिवस ब्लॉकचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले असून, यातील पाच दिवस 10 तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे.

State Cabinet Decision: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू, मंत्रिमंडळ बैठकीतील 14 निर्णय

Amol More

मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्यानं पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Narendra Modi On Badlapur Sexual Assualt Case: महिला अत्याचाराप्रकरणारील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी; बदलापूर प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींचे भाष्य

Amol More

महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधम माफीस पात्र नाही. अशा घटनेतील आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे. मी प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्य सरकारला सागू इच्छितो की, महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य आहेत.

Advertisement

HC on Suicide: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मानसिक आजारांच्या तरतुदींनुसार शिक्षा होऊ शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय

Jyoti Kadam

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मानसिक आजारांच्या तरतुदींनुसार शिक्षा होऊ शकत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने म्हटले आहे.

Nashik Gangapur Dam: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; गोदावरी नदीला पूर आल्याने लहान मंदिरे पाण्याखाली

Jyoti Kadam

गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसला आहे. त्यामुळे अनेक छोटी मंदिरे पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे.

GSB Seva Mandal King Circle Ganpati 2024: जीएसबी सेवा मंडळ किंग्स सर्कलच्या बाप्पांचा यंदा 400 कोटींचा विमा

Amol More

यंदा जीएसबी सेवा मंडळाने सुमारे 400.58 कोटींचा विमा उतरवला आहे. मागील वर्षी तो 360 कोटी होता. पण वर्षभरात सोन्याचे दर वाढले आणि त्याचा परिणाम विम्याच्या किंमतीवरही झाला आहे.

Ganeshotsav 2024: आता गणेशोत्सवासाठी विमानाने कोकणात जाता येणार; केव्हापासून आणि कुठूण सेवा सुरू? घ्या जाणून

Jyoti Kadam

भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव पार पडावा यासाठी राज्यसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यात आता गणेशोत्सवासाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे-गोवा आणि पुणे-सिंधुदुर्ग या दोन ठिकाणी ही सेवा सुरू 31 ऑगस्टपासून होत आहे.

Advertisement

Lakhpati Didi Sammelan in Jalgaon: लखपती दीदी संमेलन जळगाव येथून Narendra Modi Live

टीम लेटेस्टली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगाव येथील लखपती दीदी संमेलन सोहळ्यात ते सहभागी झाले असून, उपस्थितांना संबोधित करत आहेत. पंतप्रधानांचे थेट भाषण आपण येथे पाहू शकता.

Ganpati Special ST: चाकरमान्यांसाठी लालपरी सज्ज; मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 75 टक्के जादा बसेस बुक

Bhakti Aghav

बृहन्मुंबई ते रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नेहमीच्या बसेस व्यतिरिक्त, एसटी महामंडळाने या वर्षी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती मागणी पाहता गतवर्षीच्या तुलनेत बसची संख्या वाढवण्यात आली आहे.

Palghar Rape Case: पालघर हादरलं, 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

Pooja Chavan

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ४२ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची माहिती आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

Shivshahi Accident : अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात; एकाचा मृत्यू, 25 जखमी

Jyoti Kadam

नागपूरहून अकोल्या जाणाऱ्या शिवशाही बसचा अमरावती -नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे 30 प्रवाशांना घेऊन जाणारी बस महामार्गावरच उलटली. परिणामी २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

Advertisement

Weather Forecast Maharashtra: पुणे, सातारा, घाट परिसरात मुसळधार पाऊस, IMD कडून सतर्कतेचा इशारा, जाणून घ्या मुंबई, ठाण्याचा हवामान अंदाज

Annasaheb Chavare

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवसांत पुणे (Pune Weather) आणि सातारा (Satara Weather) येथील घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) इशारा दिला आहे. मान्सूनच्या हालचालींमध्ये घोणाऱ्या लक्षणीय बदलानंतर हा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाठिमागील दोन दिवसांपासून दमदार पावसास पुन्हा एकदा सुरुवात (Weather Forecast Maharashtra) झाली आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

भारतीय हवामान खात्याने (IMD)आजपासून मुंबईसाठी २६ ऑगस्टपर्यंत पिवळा अलर्ट जारी केला आहे. अंदाजानुसार शहरात शनिवार व रविवार दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, जो पुढील आठवड्यापर्यंत वाढू शकतो. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील २४ तासांत आर्थिक राजधानी आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Mumbai Students Brutally Beaten: मुलींच्या टोळक्याकडून विद्यार्थींनीला भररस्त्यात बेदम मारहाण, वर्सोवा येथील घटना (Watch Video)

Pooja Chavan

मुंबईतील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला मुलींच्या गटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Crime: मानखुर्द येथे क्लिनिकबाहेर दुचाकी पार्किंगच्या वादातून महिला डॉक्टरला मारहाण; 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

Jyoti Kadam

मानखुर्द भागात शनिवारी एका महिला डॉक्टरला दुचाकी पार्किंगच्या कारणावरून तिच्या क्लिनिकसमोर मारहाण करण्यात आली. त्या प्रकरणात पोलसांनी तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement