GSB Seva Mandal King Circle Ganpati 2024: जीएसबी सेवा मंडळ किंग्स सर्कलच्या बाप्पांचा यंदा 400 कोटींचा विमा

यंदा जीएसबी सेवा मंडळाने सुमारे 400.58 कोटींचा विमा उतरवला आहे. मागील वर्षी तो 360 कोटी होता. पण वर्षभरात सोन्याचे दर वाढले आणि त्याचा परिणाम विम्याच्या किंमतीवरही झाला आहे.

गणपती बाप्पाचं आगमन आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. मुंबई शहरामध्ये बाप्पाच्या या 10 दिवसांच्या पाहुणचारासाठी सारं शहर सजलं आहे. नाक्यानाक्यावर सार्वजनिक मंडळामध्ये बाप्पा विराजमान झालेला असतो. अशामध्ये किंग्स सर्कल (King's Circle) भागातील जीएसबी सेवा मंडळाचा (GSB Seva Mandal) गणपती हा खास करून ओळखला जातो तो त्याच्या सोन्याने वेढलेल्या सौंदर्यासाठी. दरवर्षी बाप्पाचं रूप बघण्यासोबतच त्याच्या विम्याची देखील चर्चा होते.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now