Palghar Rape Case: पालघर हादरलं, 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
४२ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची माहिती आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
Palghar Rape Case: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 42 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची माहिती आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रामा गणपत भोईर असं आरोपीचे नाव आहे. तो तारापूर येथील रहिवासी आहे. (हेही वाचा- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन महाविकासआघाडीची राज्यभर निदर्शने)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दुपारी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. रामा पीडितेच्या परिसरातील रहिवासी आहे. मुलीला त्याने एका निर्जनस्थळी बोलावून घेतले आणि तिथे तीच्यावर बलात्कार करण्यात आला. मुलीने कसा बसा जीव वाचवून घटनास्थळावरून पळ काढला. तीने घटनेची माहिती आई वडिलांना दिली. आई वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. (हेही वाचा- इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! 21 वर्षीय महिलेचे अपहरण करून बलात्कार, दोन जणांना अटक)
पालघर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. भोईर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 64 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidya Mandir) शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या कथीत लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.