Shivshahi Accident : अमरावती-नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा अपघात; एकाचा मृत्यू, 25 जखमी

त्यामुळे 30 प्रवाशांना घेऊन जाणारी बस महामार्गावरच उलटली. परिणामी २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

Photo Credit- X

Shivshahi Accident: अमरावती नागपूर महामार्गावर (Amravati Nagpur Highway)नागपूरहून अकोल्याच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसमधून जवळपास 35 प्रवासी प्रवास करत होते. त्यावेळी एक गाय अचानक रस्त्यावर आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस (Shivshahi Bus Accident)डायरेक्ट उलटली. त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नागपूर- मुबंई महामार्ग एकाबाजूने बंद करण्यात आला आहे.(हेही वाचा: MSRTC Shivshahi Bus Accident: शिवशाही बस आणि कंटेनरचा पुणे येथे भीषण अपघात, एक ठार, 6 गंभीर जखमी)

ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी महामार्गावर क्रमांक 6 वर एक गाय या बसच्या मध्ये आली. यावेळी गाईला पाहून तिला वाचवण्याचा प्रयत्नात बस चालकाने एकदन जोरात ब्रेक लावला. मात्र त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान कोणीीही गंभीर दुखापतग्रस्त झाले नसल्याचे समजते. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा: Shivshahi Bus Accident: नाशिक-औरंगाबाद शिवशाही बसला अपघात; एकाचा मृत्यू)

दरम्यान, बस चालकाने घटनाक्रम सांगितला, 'मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण माझी गाडी पलटी झाली. माझ्या बसमध्ये एकूण 35 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातील 28 जण जखमी झाले आहेत,' अशी प्रतिक्रिया या अपघातग्रस्त झालेल्या शिवशाही बसच्या चालकाने दिली.